पळस, वारूळ व कडुलिंब यांवर आरोहण; तेल कापूस, पेंड व लोखंड यांची प्राप्ती; विपत्ती करणारी होय. विवाह करणे, तांबड्या पुष्पांची माला व आरक्त वस्त्र धारण करणे, उदकाच्या प्रवाहाने वाहून जाणे, शिजलेले मांस भक्षण करणे ही पाहिली असता नाशकारक जाणावीत. सूर्य व चंद्र प्रभाहीन पाहाणे व आकाशातून तारे स्वप्नात पडताना दिसणे यापासून मरण अथवा शोक प्राप्त होतो. अशोक, करवेल, पळस हे वृक्ष पुष्पसहित पाहिले असता शोक प्राप्त होतो. नौकेत आरोहण केलेले पाहिल्यास, प्रवास प्राप्त होतो. आरक्त वस्त्र व आरक्त पुष्पे धारण करणार्या स्त्रियेस आलिंगन केले असता मृत्यु प्राप्त होतो. घृत व तैलादिकांचा अंगास अभ्यंग केलेला पाहिल्यास व्याधि प्राप्त होल. केस गळाले व दात पडले असे पाहिल्यास धननाश व पुत्रशोक होईल. गर्दभ व उंट अथवा रेडा यांजवर बसलेले किंवा रथास जुंपून त्यात आरोहण केलेले पाहिल्यास मृत्यु येईल. नाक, कान इत्यादि अवयवांचा छेद, चिखलात बुडणे, तैलाभ्यंग, विषभक्षण, प्रेताचे आलिंगन व जास्वंदीच्या फुलांच्या माळा धारण केलेल्या नग्न कृष्ण वर्ण पुरुषाचे दर्शन, ही सर्व मृत्युकारक होत.