रोग उत्पन्न झाला असता नक्षत्राची फळे
१. अश्विनी नक्षत्रावर ज्वरादि रोग झाल्यास एक, नऊ किंवा २५ दिवस पीडा होइल, असे जाणावे.
२. भरणी नक्षत्रावर रोग झाल्यास ११ दिवस, २१ दिवस, किंवा महिनाभर पीडा होईल अथवा मृत्युही होईल.
३. कृत्तिका नक्षत्राची पीडा १० दिवस, ९ दिवस किंवा २१ दिवस.
४. रोहिणी नक्षत्राची १०-९-७ किंवा ३ दिवस पीडा.
५. मृगाची ५-९ किंवा ३० दिवस.
६. आर्द्रा नक्षत्री रोग झाला असता मृत्यु, १० दिवस किंवा एक महिनाभर पीडा
७. पुनर्वसूची ७ किंवा ९ दिवस पीडा अथवा मृत्यु.
८. पुष्याची पीडा ७ दिवस किंवा मृत्यु.
९. आश्लेषा नक्षत्री मृत्यु अथवा २०-३० किंवा ९ दिवस पीडा.
१०. मघा नक्षत्री मृत्यु किंवा १॥ महिना, १ महिना किंवा ३० दिवस पीडा.
११. पूर्वा नक्षत्री मृत्यु किंवा वर्षभर, महिनाभर, १५ दिवस किंवा ६० दिवस पीडा
१२. उत्तरा नक्षत्री आजारी पडल्यास २७ दिवस, १५ दिवस किंवा ७ दिवस पीडा.
१३. हस्त नक्षत्री मृत्यु किंवा ८-९-७ अथवा १५ दिवस पीडा.
१४.चित्रा नक्षत्रावर आजारी पडल्यास १५-८-१० किंवा ११ दिवस पीडा.
१५. स्वाति नक्षत्री मृत्यु किंवा १-२-३-४ व ५ महिन्यांनी किंवा १० दिवसांनी रोगनाश.
१६. विशाखा नक्षत्री १ महिना, पंधरवडा, आठवडा किंवा २० दिवस पीडा.
१७. अनुराधा नक्षत्री १० किंवा २८ रात्री पीडा.
१८. ज्येष्ठा नक्षत्री मृत्यु किंवा एक पक्ष, मास किंवा २१ रात्रीपर्यंत पीडा.
१९. मूळ नक्षत्रावर रोग आल्यास मृत्यु किंवा पक्ष, ९ रात्री किंवा २० रात्रीपर्यंत पीडा.
२०. पूर्वाषाढा नक्षत्री मृत्यु किंवा २-३-६ महिन्यांनी अथवा २० दिवस किंवा पक्ष यांच्या आत रोगनाश.
२१. उत्तराषाढा नक्षत्री १॥ महिना. २० रात्री किंवा महिनाभर पीडा.
२२. श्रवण नक्षत्री २५-१०-११ किंवा ६० दिवस पीडा.
२३. धनिष्ठा नक्षत्री १० रात्री, पक्ष, मांस किंवा तेरा रात्री पीडा.
२४. शततारका नक्षत्री १२ किंवा ११ दिवस पीडा
२५. पूर्वाभाद्रपदा नक्षत्री मृत्यु किंवा २-३ महिने अथवा १० रात्री पीडा.
२६. उत्तराभाद्रपदा नक्षत्री १॥ महिना, पंधरवडा, आठवडा, किंवा १० दिवस पीडा.
२७. रेवती नक्षत्रावर ज्वरादि रोग उत्पन्न झाला असता दहा दिवस किंवा २८ रात्री पीडा. जन्मनक्षत्र, जन्मराशी व आठवा चंद्र असता रोग झाल्यास मृत्यु येईल. रवि इत्यादि वारी क्रमाने मघा व द्वादशी, विशाखा व एकादशी, पंचमी व आर्द्रा, तृतीया व उत्तराषाढा, शततारका व षष्ठी, अष्टमी व अश्विनी; पूर्वाषाढा व नवमी असे वार, तिथि व नक्षत्र या तिहींचा योग असता रोग उत्पन्न झाल्यास याचप्रमाणे रवि, चंद्र इत्यादि वारी अनुराधा व भरणी, आर्द्रा व उत्तराषाढा, मघा व शततारका, विशाखा व अश्विनी; ज्येष्ठा व मृग; श्रवण व आश्लेषा; पूर्वाभाद्रपदा व हस्त, ही असता मृत्युयोग होतो. यासाठी उक्त तिथि, वार व नक्षत्र यांच्या शांति कराव्यात. ज्या नक्षत्री मरण सांगितले आहे त्या नक्षत्राची शांति अवश्य करावी. अन्य नक्षत्राची करावी अथवा करू नये.