मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
प्रयाणास लग्नशुद्धि

धर्मसिंधु - प्रयाणास लग्नशुद्धि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


ज्या लग्नी प्रयाण करावयाचे असेल त्या लग्नापासून १-४-७-१०-९ व ५ या स्थानी असलेले शुभग्रह इष्ट होत. ३-११-६-१० या स्थानी असलेले पापग्रह अशुभ होत. दशम शनि व सप्तम शुक्र हे अनिष्ट होत. ६-८-१२-१ या स्थानी असलेला चंद्र अशुभ होय. यात्रालग्न ५ स्वामी ७-६-८ व १२ या स्थानी अशुभ होय. लग्नी वक्री ग्रहाचा वर्ग, वक्री ग्रहाचा वार कुंभलग्न व कुंभलग्नाचा नवांश हे प्रयाणलग्नी प्रयत्नाने वर्जावेत. मीन लग्नावर किंवा मीनांशी प्रयाण करणाराचा प्रवास अत्यंत दुःखदायक होतो. आपल्या लग्नापासून किंवा जन्मराशीपासून ६ वी राशी अथवा तिचा स्वामी हे मृत्यु देणारे होत. शत्रुगृही किंवा त्याच्या अंश त्याची दृष्टी असता प्रयाण करणे शुभकारक नाही. अस्तंगराशी व जन्मराशी लग्नी शुभ नाही. वर्गोत्तमी व वर्गोत्तमयुक्त लग्नी चंद्र असल्यास जयप्राप्त होतो.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP