पदसंग्रह - पदे ११ ते १५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ११.
देशिकराज दयानिधि लीलाविग्रह जगदोद्धारी ॥ नित्य निरंजन सज्जन रंजन साधू विजन विहारी ॥धृ०॥
निजसुखदायक सिद्धि विनायक मूर्तिमंत सज्ञानी ॥ निर्विकार चित्सागर नगर अवतरला ये अवनीं ॥
निष्कळंक हे दैवि संपत्ति भोगितसे दिनरजनीं ॥ निजानंद घन ब्रह्म सनातन विचरे सच्चिद्भुवर्नं ॥१॥
रज तम निरसुनि शुद्ध सत्वपद तत्व विभागीं चतुर ॥ रत सत्कर्मीं सतत स्वधर्मीं आत्मानात्मविचार ॥
रजतशुक्तिके वरि तैसा हा देखे जगदाकार ॥ रंका निजपद देउनि करितो ब्रह्मरूप संसार ॥२॥
जग नग चित्सुवर्णीं पाहे अभेदबुद्धि सहज ॥ जळगोरेच्या न्यायें लक्षी नाम रुपात्मक काज ॥
जन्ममरण म्हणणें हें अवघें कल्पनेचें चोज ॥ जड अजड हे वार्ता स्वप्नीं नेणें तो गुरुराज ॥३॥
नगतनयात्मज लंबोदर सुरवर वरदें सज्ञान ॥ नवविध भक्ति विरक्तिसह निजकर्मानुष्ठान ॥
नभीं निळिमा भासे तैसें प्रपंचाचें भान ॥ नमिन निरजन स्वामी तो मी निजरंगें रगोन ॥४॥
पद १२.
मेघ:शाम हें नाम मुनिजनमानसविश्राम ॥ मंत्रराज चतुरक्षरी गुरुवर परिपूर्ण काम ॥धृ०॥
मेघ सर्वत्र उदार परि सत्क्षेत्रीं संभ्रमे ॥ मेदिनी संपन्न साधन युक्त निज नेमें ॥
मेरूसम गिरी निज धान्याचे पिकति अनुक्रमें ॥ मेघादिक करणें सुक सोविति अखंड गुरुनामें ॥१॥
घन गर्जुनि वर्षतां वाहाति सच्छिष्य ओघ ॥ घंटाघोषें तेहि गर्जती स्वानुभवें सैंघ ॥
घटिका पळ न विसंबिति स्वस्वरूप अमोघ ॥ घट मठ महादादिकीं जैसें एकचि नभ अनघ ॥२॥
शांति क्षमादिक दैवी संपदा शोभे सच्छिष्या ॥ शाखा कल्पतरूच्या कल्पित देती अशेषा ॥
शाश्वत सुखमय होउनि भोगिति निज निर्विशेषा ॥ शास्त्रें कुंठित झालीं महिमा न वर्णवे शेषा ॥३॥
मत्स्यादिक अवतार धरूनि केले पराक्रम ॥ मर्दुनि दानवकुळ निज भक्तां दिधलें पद परम ॥
मथन करुनि निजरंगें मेघ:शाम हें नाम ॥ मशृण यदुवीर सेवी अखंड होउनि सप्रेम ॥४॥
पद १३.
ॐ नम: शिवाय सकळही मंत्रांचा राजा ॥ षडाक्षरी षड्रस हा वोगरुं घे अविचारा जा ॥
नामामृत रसनेचा चारा रसने चारा जा ॥ निरुपम याची गोडी शिवभक्तांसि विचारा जा ॥धृ०॥
ॐ मित्येकाक्षरं मंत्र देवाधी देवो ॥ आतप्रोत भरला अवघा शाश्वत स्वयंमेवो ॥
वोळला अनुकंपें काय सांगों नवलावो ॥ वोडंबर निरसिलें ईक्षणमात्रें पाहावो ॥१॥
नमन करुनि सद्भावें याचेम आरंभितां स्तवन ॥ नष्ट दुष्ट मन संकल्पात्मक मावळलें भान ॥
नलगत लव लव पळ घटिका झाले ज्ञानसंपन्न ॥ नद नदि वापी कूप अवघें स्वानंद जीवन ॥२॥
मंत्र पडतां श्रवणीं झाला परिपूर्ण काम ॥ मदन दहन मनमोहन परात्पर मुनिमनविश्राम ॥
मंगळकारक तारक मंत्र सच्चित्सुख धाम ॥ मस्तकमणींजप नित्यनिरंतर षडाक्षरी नाम ॥३॥
सिद्ध साधक बोधक विषयी मुमुक्षु मुक्तासी ॥ शिघ्रगतीनें निजसुखदायक स्ववं प्रकाशी ॥
शिबी आदिकरुनि भक्त केले सुकराशी ॥ शिष्ट इष्ट पुरवितसे कैलासवाशी ॥४॥
वाचे उच्चारितां शमला तापत्रय वणवा ॥ वार्ता ऐकुनि धांवे श्रवणीं करुणार्णव कणवा ॥
वाक्य सुधारस बोधूं बोला षडाक्षरी प्रणवा ॥ वारंवार सकळां वदनीं हाचि मंत्र म्हणवा ॥५॥
यशस्वि त्रिभुवनीं जो या मंत्रातें गाय ॥ यम धर्मादिक सुरवर किन्नर वंदिति पाय ॥
यक्ष राक्षस झाले नेणुनि नामाची सोय ॥ यदंनिमित्य पूर्ण रंग हा काय तयातें होय ॥६॥
पद १४.
शिवेति मंगल नाम ॥धृ०॥
दुस्तरतर भवसागर तारक ॥ सच्चित्सुखैक धाम ॥१॥
निजानंद घन ब्रह्म सनातन ॥ मुनिजनमनविश्राम ॥२॥
पूर्ण रंग नि:संग निरामय ॥ अव्यय अवाप्त काम ॥३॥
पद १५.
तो गोविंदु दयासिंधू ॥ झाला प्रसन्न तुह्मांसी आनंदकंदु ॥धृ०॥
सुदाम देवाची पत्नी शोभली दिव्य कनक रन्तीं ॥
म्हणे आजी स्वामी कृषदर्शनासी तुम्हीं गेलां होतां जी महा प्रयत्नीं ॥१॥
सुवर्णाची नगरी करुनियां सर्वहि संपदा भरुनियां ॥
नारायणें दीधली तेणें दीनानाथें रमारमणें ॥ भवदु:ख दरिद्र हें निवारुनियां ॥२॥
सहज पूर्ण निजानंद रंगला जन्म मरण शोक मोह भंगला ॥
आतां हेंचि करूंजी कृष्णध्यान धरूंजी ॥ सोनियाचा दिवस आजि उगवला चांगला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP