पदसंग्रह - चतुष्टय
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[इंद्रवज्रा गण सदर.]
ज्ञानाभिमाने विदुषा न मानी ॥ जो नायके राघवकीर्ति कानीं ॥
निंदा मुखीं चंचळ चित्त पाहीं ॥ त्यातें मना सांडुनि दूर जाईं ॥१॥
अभक्ष भक्षी गुण दोष लक्षी ॥ नसे दया काम मनीं अपेक्षी ॥
मनोरथीं वादक जो प्रवाहीं ॥ त्यातें मना सा० ॥२॥
अत्यंत कोपी निजदोष लोपी ॥ जो दुष्टकर्में अवला निरूपी ॥
भोगीं संदा लालस सर्वदांही ॥ त्यातें मना० ॥३॥
वाचा बळें भाविक लोक गोवी ॥ वेदार्थ नेणें लय लक्ष लावी ॥
नेणें निजानंद ह्मणे विदेही ॥ त्यातें मना सांडुनि दूर जाईं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP