पदसंग्रह - पदे १६ ते २०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १६. कामदाछंदावर.
पूर्ण ब्रह्म तूं इंदिरावरा ॥ श्रीकृष्णजी शामसुंदरा ॥
धन्य ते तुझें ध्यान वर्णिती ॥ नित्य मुक्त जे ते अकर्णिती ॥१॥
तव पदांबुजीं भेद भंगला ॥ अरुणसंध्याराग रंगला ॥
अर्धचंद्र ते नखीं शोभले ॥ चरणपंकजीं लाभ लाभले ॥२॥
उभय गुल्फ ते इंद्रनिळ मणी ॥ अनुहात ता नाद पैंजणी ॥
आंदु नूपुरें मौन वर्जिती ॥ नेति नेति हा शब्द गर्जती ॥३॥
स्तंभ मकर तीं जानु पोटरी ॥ पितांबराचें तेज त्यावरी ॥
रंत्नजडित तें कटीसूत्र रे ॥ क्षुद्रघंटिका जपति मंत्र रे ॥४॥
नाभिकमळ तें समसमान रे ॥ विरंचिचें जन्मस्थानरे ॥
त्रिगुण त्निवळिचा उदरिं संभव ॥ न वदवे मखें तें वैभव ॥५॥
विश्वह्रदय तूं तेथ म्यां तुझें ॥ ह्रदय वर्णिजे नवल हें बुझे ॥
आवडि वेडिही धांव घेतसे ॥ आदि अंत हा न पाहतां असे ॥६॥
समुद्रास्तृप्यतां म्हणउनी ॥ जळ समुद्रिंचें अंजुळींतुनीं ॥
अर्पितां तया काय होतसे ॥ भक्तिप्रीय हे हरि तुला असे ॥७॥
असो हें आतां स्फूर्ति सावरूं ॥ ध्यान प्रोत हा पावता करूं ॥
अमृतसिंधुचा ग्रास कोणता ॥ मधुर कटु म्हणे तोचि नेणता ॥८॥
सदय ह्रदय श्रीवत्सलांछनें ॥ वळखिलें बरें भक्त मुनिजनें ॥
पदक कौस्तुभासह विराजतें ॥ निरखितां रवीतेज लाजतें ॥९॥
कंबुकंठिंही तव एकावळी ॥ दिव्य हार ते सुमुक्तावळी ॥
वैजयंती बकुल सेवती ॥ मोगरे जुई जाई मालती ॥१०॥
सरळ शुंडा दंड ते जसे ॥ श्रीहरी तुझे हस्त पैं तसे ॥
करांगुळींच्या मुद्रिका जशा ॥ दिव्य तेजें उजळती दिशा ॥११॥
हस्तकंकणें बाहुभूषणें ॥ दिनमणीसही आणिलें उणें ॥
कोटि मदन श्रीवदन-पंकजा ॥ न पवती सरी तुज अधोक्षजा ॥१२॥
किरिट कुंडलीं फांकली प्रभा ॥ सुरतरुतळीं देहुडा उभा ॥
अधरिं धरुनियां वेणुवादनें ॥ मोहिलीं तुवां व्रजवधूमनें ॥१३॥
या परी तुझें ध्यान श्रीहरी ॥ वर्णितां तुझी मूतीं अंतरीं ॥
रंगली निजानंद वैभवें ॥ न सोडी कदां तनुमनु जिवें ॥१४॥
पद १७. काशीराजकृत.
पुराणपुरुषा जगदीशा विठ्ठलरायारे ॥ तुह्में स्वरुप लक्षितां निरसे मायारे ॥धृ०॥
अगणित पौर्णिमेच्या चंद्रकलारे ॥ विश्रांतीसी आलिया श्रीमुखकमळारे ॥१॥
रत्नजडित मुकुटीं मयोरपत्रें वेढीरे ॥ त्रिपुंड्र कस्तुरीचा रेंखिला ललाटीं रे ॥२॥
आकर्णनयन श्रवणीं कुंडलें तळपती रे । नाशीक सरळ सुहास्य दंतपंक्ती रे ॥३॥
आपाद कंबुकंठीं बनमाळा शोभती रे ॥ आजानबाहु शुंडादंडाच्या आकृती रे ॥४॥
महिमा वर्णितां कुंठित झाली स्फूर्ती रे ॥ कटीं कर ठेवुनियां तूं उभा निजमूर्ति रे ॥५॥
बाहीं बाह्मवटें मणगटीं वीरकंकणें रे ॥ द कांगुळीं मीरवे मुद्रिकाचें लेणें रे ॥६॥
ह्रदयीं श्रीवत्सनव नवरत्नाचे हार रे ॥ पदकें एकावळी सुमनाचे संभार रे ॥७॥
उदरीं अनंत ब्रह्मांडें निर्विकार रे ॥ नाभि कमळीं चतुरानना नकळे पार रे ॥८॥
कटीतटीं कडदोरा कासिला पितांबर कासे रे ॥ नभीं सौदामिनिचें तेज जैसें विलसे रे ॥९॥
क्षुद्र घंटिका रुणझुणिते नि:शब्द शब्दें रे ॥ नेति वादें गर्जति परमानदें रे ॥१०॥
जानु जघन जैसे सरळ रंभास्तंभ रे ॥ विराजमान त्या पोटरिया स्वयंभ रे ॥११॥
भक्ति विटेवरी शोभती समपद सुंदर रे ॥ ध्यानें प्रसन्न झाला रखुमाईवर परतर रे ॥१२॥
घोंटी इंद्रनीळमणी चरणकमळ दळ सोज्वळ रे ॥ श्रीरगानुज आत्मज झाला तेथें अलिकुळ रे ॥१३॥
पद १८.
पूर्ण ब्रह्म निर्गुण निर्विकार वो ॥ झाला सगुण धरिला अवतार वो ॥१॥
कटीं कर ठेवुनि निरतरी वो ॥ सहज उभा विज्ञान भीमातीरीं वो ॥२॥
चरणीं तोडर नूपुरें वांकी साजे वो ॥ पतीतपावन त्यावरी ब्रीद गाजे वो ॥३॥
पीतांबर कासिला सोनेंसळावो ॥ नभीं सौदामिनीचा जैसा मेळा वो ॥४॥
न वर्णने नाभिंचें महिमान वो ॥ जेथुनि जन्म पावला चतुरा-नन वो ॥५॥
श्रीवत्सल भूषण ह्रदयावरी वो ॥ तुळसीमाळा आपाद रुळे वरी वो ॥६॥
वदन इदु महिमा वर्णुं किती वो ॥ ज्ञानी चक्रोर संतृप्त येथें होती वो ॥७॥
केशर तिलक रेखिला ललाटीं वो ॥ कुरळ केला मुकुटीं रत्न दाटी वो ॥८॥
वामभागीं शोभत भीमकबाळी वो ॥ ककमळें चामरें नित्य ढाळी वो ॥९॥
भाव लक्षुनी भक्तांचा धरी संगवो ॥ सहज पूर्ण निजानंद रंगवो ॥१०॥
पद १९.
भगवत्कृपेचा बडिवार काय सांगों वारंवार ॥ ब्रह्मादिकां नकळे पार विचार विचारीं शमला ॥१॥
पूर्वीं जीवदशे आंत तिघे शत्रु करिती घात ॥ तेचि मित्रत्वें होउनि दूत दास्य करिती सर्वरवें ॥२॥
काम क्रोध लोभ तिन्ही माहा पातकी अज्ञानी ॥ ते उपरमतां आत्मज्ञानीं झाले जिवलग सखे ते ॥३॥
सादर करितां त्याचें विवरण चुके जन्म जरा मरण ॥ अंतर्वाह्य रमारमण वोतप्रोत समसाम्यें ॥४॥
देव दिनबंधु वो देव दयासिंधु वो ॥धृ०॥
काम झाला आत्माराम पूर्ण स्वरूपीं विश्राम ॥ झाले अक्षयी निजधाम मेघ:शाम स्वरूपीं ॥५॥
क्रोध शांत निजानंदीं द्दश्य द्दष्टी दिसों नेदी ॥ ऊर्मी निमाल्या निर्द्वंद्वीं निजसुख छंदीं विलसतसे ॥६॥
लोभ जडला आत्मस्मरणीं हरिगुरुचरणीं अंत:करणी ॥ ब्रह्मानदें भरली भरणी हे नभ धरणी हरपली ॥७॥
लोहकार्याचें रूप नाम केलें परिसें अवघें हेम ॥ पूर्णरंगी तैसे काम क्रोध लोभ शोभती ॥८॥
पद २०.
या लक्षणें जो युक्त तो भक्त माझा ॥ ऐसें बोलतसे द्वारकेचा राजा ॥
त्याहुनि पढियंता मजलागीं नाहीं दुजा ॥ निश्वयेंसि बोलतों कपिध्वजा ॥धृ०॥
वर्णाश्रमें वेदोक्त कर्में करितां ॥ अहंकर्तृत्वाचा लेश नुपजे चित्ता ॥
काम्य निषेधाची निमाली दुर्वाती ॥ क्रिया मात्र ज्याची ब्रह्मार्णण तत्वता ॥१॥
आत्मलाभे संतृप्त सर्वदांही ॥ भगवद्भजनीं शोभलीं करणें दाही ॥
देहीं विदेहता बाणली पूर्ण पाहीं ॥ लीलाविग्रही तो ह्मणती चारी साही ॥२॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे सरली बोली ॥ ध्येय ध्याता ध्यान हे सहजी ठेली ॥
निजानंदीं रंगतां वृत्ति निमाली ॥ स्वयें तोचि मी हे काय बोलों बोली ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP