मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ८६ ते ९०

पदसंग्रह - पदे ८६ ते ९०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ८६.
ज्ञानी व्कचित व्कचित महाराज ॥धृ०॥
सर्व भूतिं सर्व कर्मीं ब्रह्मस्थिती ॥ भोगिति सुमतीभाज ॥१॥
सर्वीं सर्वातीत नित्य सदोदित ॥ साविति जे निजकाज ॥२॥
निज रंगें रंगुनियां त्यागीति ॥ बय शंका आणि लाज ॥३॥

पद ८७.
रामीं आराम जया ॥ भवभय कैचें काय तया ॥
कर्पूर दीपकसंगें आंगें जाय समुळ विलया ॥धृ०॥
वण सुगंध तुका तुकितां भ्रम मात्नचि तितुका ॥
दशशातवदनें गुणगण स्तवितां ॥ झाला शेष मुका ॥१॥
रक्षा ना वन्ही तेथें हारपलीं दोन्हीं ॥
अहं ब्रह्म हें-ही स्फुरण निमालें पूर्ण अधिष्ठानीं ॥२॥
पूर्ण निजानंदीं रंगुनि न पडति भवबंदीं ॥
सहज पदीं द्दढ निश्वळ राहुनि क्रीडती स्वच्छंदी ॥३॥

पद ८८.
हरिरंगें रंगले त्यांला भवभय हें नाहीं ॥
देहबुद्धीं विचरतां जड जीव पडिले प्रवाहीं ॥धृ०॥
काय एक न घडे हरिसंकल्पें कल्पांतीं ॥ काय जिवाचि हानी करिती चींता कां चित्तीं ॥
सद्रुरुभजन करावें समुळीं सांडुनि भवभ्रांती ॥ क्षीर नीर आत्मानात्म-विवेक निवडे हंसगती ॥१॥
पृथ्वीहुनि सिंधूजळ दशगुण एकार्णव-समयीं ॥ कवण निवारिल त्यातें कैंचें स्थिरचर ते ठायीं ॥
द्वादश रवि तपती वरि भूतळ रक्षा महाप्रळयीं ॥ योजिल काय कळेना उपाय पडतां अपायीं ॥२॥
ब्रह्मादिक चिरंजीवित तेही कल्पांतीं जाती ॥ क्षण भंगुर हा भास मिथ्या न दिसे आद्यंतीं ॥
गंधर्वनगरींच्या कवणे निवडाव्या याती ॥ नसतां दिसतें मृगजळ जग मृग नेणें मंदमती ॥३॥
मायार्णविंचें दुस्तर जळ वरि तरंगवत्‌ सर्व ॥ ब्रह्मांडीं हे बुद्धुद जड जिव करिती कां गर्व ॥
निमिष्यमात्रें उठती फुटती सुरगण गंधर्व ॥ कवण पाड इतरांचा काय मानूं अपूर्व ॥४॥
भयकृद्भयनाशक सद्भावें भजतां श्रीहरी तो ॥ दुर्जय भवभय ईक्षणमात्रें करुणाकर हरितो ॥
सहज पूर्ण निज रंगें मर्दित भव-वारण हरि तो ॥ दीनदयाघन पतीतपावन मानस-मोहरि तो ॥५॥

पद ८९. (श्रीशिवध्यान)
ऐसा शंभू देखिला आजी नयनी हो ॥
ध्यान ह्रदयीं न विसंबों अशनीं शयनीं हो ॥धृ०॥
हर मृड सांब सदाशिव शंकर कर्पूरगौर हो ॥
भस्मोद्धलित मस्तकीं जटाभार हो ॥१॥
दिव्य गंगा विलसतसे विराजमा न हो ॥
शोभे सर्वांगीं गजचर्मांबरपरिधान हो ॥२॥
अर्घ शशांक धरियला विशाळ भाळीं हो ॥
त्या अभिधानें श्रुति वदती चंद्रमौळी हो ॥३॥
तृतिय नयनीहुनि निघताती अग्निज्वाळा हो ॥
भयभीत कंठीं लवंथवीत मुंडमाळा हो ॥४॥
कंठीं हळाहळ सर्वांगीं फिरती व्याळ हो ॥
स्मशानवाशी करकमळीं नरकपाल हो ॥५॥
दशभुज पंचवदन सुखसदन परात्परतर वर हो ॥
पाहा वृषभवहन मनमोहन दयाघन अंतर हो ॥६॥
चिता भस्म चर्चुनियां भूतनाथ हो ॥
शोभे व्याघ्राजिन आरुनीं उमाकांत हो ॥७॥
त्निशूळ डमरू विराजत आय़ूधें करीं हो ॥
निजभक्तांतें संरक्षित परोपरी हो ॥८॥
गणपति-षतननादिक शिवगण घंटाघोष हो ॥
हर हर शब्दें गर्जति अति संतोषें हो ॥९॥
षोडशोपचारें शिवभक्त करिती पूजन हो ॥
एक ध्याती चित्तीं निर्गुण नित्य निंरजन हो ॥१०॥
एक सहज पूर्ण निजानेद रंगें हो ॥
शिव शिव स्मरतां शिव झाले सानुरागें हो ॥११॥

पद ९०.
मज हें योग्य नव्हे पाहतां ॥ या देहबुद्धीनें राहातां ॥
दुस्तरतर भव पूरप्रवाहीं बहुतर श्रम वाहतां ॥धृ०॥
नरदेह परम सखा असतां अनुकूल स्वात्मसुखा ॥
विषयविलासीं गुंतुनि पात्र मीं व्हावें भवदु:खा ॥१॥
कामाविक आसुरी दुर्गुण हिंसक षडैवरी ॥
विष पियूषवत दावुनि मजला मारिति मदन शरीं ॥२॥
त्यागुनि निज रंगा सेवूं कुत्सित तनु संगा ॥
कंटकवनिं भ्रमतां बहु होतो खेद मनोभृंगा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP