मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
विषयपंचक

पदसंग्रह - विषयपंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


द्दष्टी दीप पतंग लक्षुनि उडी चालूनियां तो जळे ॥ ऐसें दुर्घठ दु:खरूष विषयीं ब्रह्मादिकां नाकळे ॥
या एका विषयें तयांसि व्यसनीं पाडूनि केलें असें ॥ जे या सेविति नित्य पंच विषयां होईल त्यांचें कसें ॥१॥
नादीं लुब्धक वेध लाउनि मृगां घंटारवें पारधी ॥ मारी बाण अचूक ठाण धरुनी तत्काल शस्त्रें वधी ॥
या एका विषयें० ॥ जे या सेविति नित्य पंच विषयां० ॥२॥
झाला मत्त करी करीण दुसरी स्पर्शें तिच्या तो वनीं ॥ पावे बंधन दासमुक्त असतां घेउनि येती जनीं ॥
या एका विषयें० ॥ जे या सेविति० ॥३॥
स्वेच्छा मस्त्य जळीं क्रिडे परि गळीं लागोनियां सांपडे ॥ तो येऊनि कडे पडे मग उडे प्राणांत जेव्हां घडे ॥
या एका० ॥ जे या सेविति० ॥४॥
पद्मीं षट्‌पद गुंतले परिमळासाठीं तडागोदरीं ॥ तेथें वारण भक्षिताति कमळें संहारले यापरी ॥
या एका० ॥ जे या सेविति० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP