मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
स्फुटश्लोक

पदसंग्रह - स्फुटश्लोक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[शिखरिणी]

असंख्याता वृत्ती विचरत पदार्थीं बहु परी ॥ असें चित्स्पुर्ती तैं. विरहित नसे मात दुसरी ॥
घटाकारें पृथ्वी कनक कटकीं तोय लहरी ॥ कृपें तैसी सत्ता विलसत विना भेद कसरी ॥१॥
घटा लक्षूं जातां घटपण तथामाजिं न वसे ॥ अलंकारीं सोनें जग नग तसा हेमचि देसे ॥
तसा आत्मा देहीं अनुभवि सदां जे मिरवती ॥ प्रपंचीं ते योगी विधि हर तयालागिं नमिती ॥२॥
जळा क्षाळी जाळी अनल पवनालागिं उडवी ॥ मना बुद्धी गाळी अखिल सदतीं व्योम दडवी ॥
विदेहत्वें चाळी विविध समुळीं भेद बुडवी ॥ निजानदें पाळी अघटित जनीं तेंचि घडवी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP