पदसंग्रह - पंचक
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[इंद्रवाज्रा गण त, त, ज, ग, ग.]
मोहांधकारीं विविहीन कोपी ॥ कां लोळसी रे अति दीनरूपी ॥
ना होति कोणीं तज सोख्यकारी ॥ विश्वंभरावांचुनि कोण तारी ॥१॥
वांचचूतियां मोक्ष विलासविद्या ॥ जे साधिती ते सकळै अविद्या ॥
तें जाणणें मानवदेहवारी ॥ विश्वंभरावांचुनि० ॥२॥
दारा प्रजा मित्र सकामवर्ते ॥ कोणी हितालागुनि न प्रवर्ते ॥
कां झांकिसी लोचत दुर्निवारीं ॥ विश्व० ॥३॥
दिगमंडळीं चाळक विश्वकाती ॥ पाळी सृजी आणि निदानकर्ता ॥
त्या नेणतां काल विशाळ मारी ॥ विश्वंभरा० ॥४॥
संकल्पसंगाप्रति ज्ञानचक्षीं ॥ लक्षूनियां रंग निजालपक्षीं ॥
सारांश साधीं न पडे विकारीं ॥ विश्वभरा० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP