मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[भुजंगप्रयात, गण य, य, थ, य.

(रंगनाथस्वामींचें आपल्या वडिलांविषयीं बोलणें आहे.)
सखा सद्नुरू बाप माझा निजाचा ॥ गिरा केवि वर्णूं शके पार याचा ॥
सुखा पात्र केलें विना क्लेश येणें ॥ दुजा देव नेणें दुजा देव नेणें ॥१॥
दिसे ते नसें देखणें मात्र साचे ॥ कला दीधली थोर कोशल्य याचें ॥
कृपाळूपणें सोडवीलें उपेणें ॥ दुजा देव० ॥२॥
स्वसाम्राज्य देऊनियां भ्रांति नेली ॥ पदीं आपुले थोर विश्रांति केली ॥
वदों काय याचें अनिर्बाच्य देणें ॥ दुजा० ॥३॥
स्वसंवेद्य अच्छेद्य तें रूप माझें ॥ करी दूरी देहीं असंबद्ध ओझें ॥
करी शांतिचें सांग सर्वांग लेणें ॥ दुजा० ॥४॥
अकर्तात्मबोधें लिळा खेळ दावी ॥ पदीं रंगती त्या निजानंद दावी ॥
द्विधा बोलणें बोलिजे येथ कोणें ॥ दुजा० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP