मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४२६ ते ४३०

पदसंग्रह - पदे ४२६ ते ४३०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४२६.
राघव स्वामी आमुचा जीवन जीवाचा ॥धृ०॥
पिळुनि प्रळय-विजा रस काढुनी मूसे ॥ घालुनि श्री तनु वोतिली राघवरूप तैसें ॥१॥
बुद्धुद उठत फुटा जळ निश्वळ भारी ॥ जन हे नासत भासत राघव अ-विकारी ॥२॥
जनीं वनीं जीवनीं पाहतां निजस्वरूपचि भासे ॥ निजानंदें पाहतां मुळीं रंगचि नसे ॥३॥

पद ४२७. [अभंग]
तैसी माझी हे वायाळी ॥ घाणा इक्षुदंड गाळी ॥धृ०॥
नाहीं स्वसुखाची आवडी ॥ मिरवी प्रतिष्ठा कावडी ॥१॥
बरवें बोलणें बरवें गाणें ॥ दावी रूप कोडिसवाणें ॥२॥
वस्त्रा पडों नेदी सुरडी ॥ नेत्र फिरवी अंग मुरडी ॥३॥
माझी परिसोनियां युक्ती ॥ करोत भाविक माझी भक्ती ॥४॥
देवा तोडुनि हा दु:संग ॥ निरभिमानें रंगविं रंग ॥५॥

पद ४२८.
धावें पावें राघवा दीनबंधू रे ॥ भवभय हरणा करुणासिंधु ॥धृ०॥
वियोगें तुझिया आलें जीवपण रे ॥ अविद्या लागली द्दढतर जाण रे ॥
विषयीं हा शिणतो सोडवी कोण रे ॥१॥
विषय ध्यास हा न सुटे पाहें रे ॥ अति चपळ मन हें स्थीर न राहे रे ॥
पराधीन जाहलों चुकलों सोय रे ॥२॥
परिसुनि पातला निजमूर्ति राम रे ॥ कर ठेउनि मस्तकीं हरिला श्रम रे ॥
चरणीं रंगुनि हरिला भ्रम रे ॥३॥

पद ४२९.
सखिये हरिविण न गमे एक क्षण करूं काय वो ॥ आठवतां गुण रूप सगुण मन विरोनि जाय वो ॥
हरिरस सुरस सुधारस अनुपम चित्त न धाय वो ॥ शुक सनकादिक बळी भीष्म वाल्मीक तन्मय माय वो ॥१॥
व्यास पराशर नारद तुंबर कीर्ती गाती वो ॥ अंबरीष प्रर्‍हाद बिभीषण मूर्ती ध्याय वो ॥
शेष रमा हनुमंत परिक्षिती मग्न चित्तीं वो ॥ त्या सुख संगें निजानंदें रंगल्या भक्तजाती वो ॥२॥

पद ४३० [ प्रासंक, हिंदुस्थानी.]
विचित्र गति आजि भईरि माई ॥ध्र०॥
अलख निरंजन सुलोलागा ॥ देह बिदेह गवाई ॥१॥
देखति हुं तो सब धोका भागा ॥ सहज समाधी मे पाई ॥२॥
संग निःसंग भया एक रंग ॥ निजानंद गीत गई ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP