मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५३१ ते ५३५

पदसंग्रह - पदे ५३१ ते ५३५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५३१. [काशीराजकृत. चाल-तें मन निष्ठुर काम केलें]
हरि कां मन निष्ठुर केलें ॥ध्रु०॥
दीनदयाळ कृपाळ कृपानिधि काय तुझें ब्रिद झाले रे ॥१॥
अंतर्साक्षणपासि तुझ्या तुजपासुनि कोणी नेलें रे ॥२॥
श्रीरंगानुजात्मज करुणा भाकित व्यर्थचि गेलें रे ॥३॥
 
पद ५३२. [का. कृ]
दे दे वो राघे पांवा माझा वेंगीं ॥ध्रु०॥
अनावर गोधनें धांवति विषयरानीं कैसी आवरती मजलागीं ॥१॥
मज माझ्या पाव्यांविण न कंठे अर्ध क्षण वाहतों तुझी आण प्रसंगीं ॥२॥
श्रीरंगानुजात्मासी विदित हा पांवा त्यासी ॥ रंगला सहज रंगीं ॥३॥

पद ५३३.
याची कैसी खंती वाटेना ॥ ह्रदयीं असुनि हरि भेटेना ॥ध्रु०॥
दिवसें दिवस लोटले ॥ श्रवणें श्रवण काटले ॥ भ्रांती पडदा आझुनि फिटेना ॥१॥
जन्मजन्मांतरीं ॥ अंतरला हरि ॥ विषय सेवितां चित्त विटेना ॥२॥
अनुतापें साधनीं ॥ शुद्ध सत्व होऊनि ॥ निजरंगाचा ठसा उमटेना ॥३॥

पद ५३४.
सखा हरि भेटवा हो ॥ध्रु०॥
घोर संसारीं अंतरल हरी ॥ मनो दूत तयाप्रति पाठवा हो ॥१॥
लागली तयाचि चाड पुरवा जिविचें कोड ॥ निजानंद रंगें नभ दाटवा हो ॥२॥

पद ५३५.
कोणि तरी ह्मणोत कांहीं ॥ कृष्णीं रातलें संशय नाहीं ॥ध्रु०॥
वर्णाश्रमावेगळी ॥ यातीकुळाहुनि निराळी ॥ ह्मणती मजला कीं हेचि बोलली ॥१॥
पर-पुरुषीं वेधली ॥ तेणें सुखें बोधली ॥ मी ह्मणतीं पुण्यें फळासि आलीं ॥२॥
अंत:सुखें रातलीं ॥ निजानंदें मातलीं ॥ निरतिशय रंगें वेडी केली ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP