मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५५ ते ५६

पदसंग्रह - पदे ५५ ते ५६

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५५. काशीराजकृत दिंडिगा.
जय जयो बा सद्नुरु राजा ॥ परंपरा आनंद सांप्रदाया ॥
देइं चित्स्फूर्ति गुण तुझे गाया जी जी जी जी ॥ ओ दिंडिगाण प्रार्थना कराया ॥धृ॥
आदि पुरुष तो वैकुठराणा ॥ जगद्नुरु निर्विकल्पतरू जाणा ॥
स्मरणमात्रें वारितो जन्ममरणारे ॥ नमन माझें त्या स्वामिचरणा ॥१॥
ब्रह्मा विष्णु रुद्र एकरूप झाले ॥ अरूप रूपें अनाम नाम पावले ॥
शरण सदिशष्य बहुत जया गेले जी ॥ दत्तात्रयाचीं वंदिन पाउलें ॥२॥
सदानंदा यतिवरा निर्विकारा ॥ तुवां अचेतना चेतविलें स्थावरा ॥
झाल्या चौर्‍यायशीं समाधि त्या सैरारे ॥ बिद्वद्वर्या चित्सूर्या दिनोद्धारा ॥३॥
भक्ति विरक्ति प्रबोधकंद ॥ देहिं विदेहं नित्य निर्द्वंद्व ॥
सोह ब्रह्म हाही मावळला स्फुंद जी ॥ रामीं आराम तोचि रामानंद ॥४॥
नित्य निष्कळंक शुद्ध बुद्ध मुक्त ॥ दिव्य तेजोमय स्वप्रकाशयुक्ता ॥
पूर्ण ज्ञानियां अभेद भक्त ॥ अमलानंद अव्यय अव्यक्त ॥५॥
आधिष्ठान अचळ सर्वत्रव्यापी ॥ या प्रत्ययें द्वैतभाव लोपी ॥
भेद स्वप्नींही नायके कदापी ॥ स्वामी गंभिरानंद तो प्रतापी ॥६॥
अहं ब्रह्मा हें स्फुरण जेथें नाहीं ॥ निर्विकल्प निर्विशेष दशा पाहीं ॥
जेथें चित्सौख्य उदेलें जें कांहीं ॥ ब्रह्मानंद तो बोलती चारी साही ॥७॥
सहजानंद तो कल्याणवाशी ॥ कृपाद्दष्टिनें त्रिविध भेद नाशी ॥
शरण सद्भावें रिघावें तयासी ॥ ८॥
परिपूर्ण मी अव्य अविनाशा ॥ या स्वानुभवें सर्वदां संतोष ॥
अखंड दंडायमान निर्विशेष ॥ पूर्णानंद तो नित्य निर्दोष ॥९॥
आत्मलाभें संतृप्त सर्वदांही ॥ भगवद्भजनें ही शोभलीं दाही ॥
सत्यसंकल्प कल्पनातीत पाहीं ॥ निजानंद तो बोलती संत सर्वही ॥१०॥
लक्षणोक्त जो शूर संग्रापीं ॥ विदेहत्वें नातळे गुणग्रामीं ॥
दैवी संपदा राहिली ह्रदौयधामीं ॥ यादवराव तो माहाराज स्वामी ॥११॥
वेद वेदांत प्रति पाद्य बोले ॥ ब्रह्म निरूपणें साधु संत धाले ॥
ज्यांचे कीर्तनीं जीव शिव ऐक्य झाले जी ॥ रंगमूर्ति तो निजानदें डोले ॥१२॥
श्रुतिसंमत ते उद्नार अनुभवाचे ॥ छेदक बहुधा जे बाण या भवाचे ॥
गुण वर्णितां कुंठित शब्द वाचे ॥ विठ्ठल राय या माहाराज याचे ॥१३॥
श्री रंगानुज तनुजें दिंडिगाणें ॥ गुरुपरंपरा धरुनि जिवें प्राणें ॥
संतसभेमाजी भलें केलं गाणें ॥ निज धन अक्षयी पासाव दान देणें ॥१४॥

पद ५६. काशीराजकृत. (बोलणें फोल झालें याचा०)
ब्राह्मणें अंत्यज-मंदिरीं मागावी ज्ञानभिक्षा ॥
विद्वज्जन जाणति त्याची परिक्षा ॥धृ०॥
अपरोक्ष अध्यास-ज्ञान ॥ गंगा भागिरथी समान ॥
पदोपदीं घडति त्या मुनि मुमुक्षा ॥१॥
हातीं घेउनि मन खर्पर ॥ भिक्षेसि जावें हो तप्तर ॥
न धरुनि तिळतुल्या कांहीं अपेक्षा ॥२॥
निजरगा सम्मुख व्हावें ॥ श्रीरंगानुज तनुजें भावें ॥
त्रिभुवन विभवाची करुनि उपेक्षा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP