पदसंग्रह - पदे १५६ ते १६०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १५६.
भ्रमरा भ्रमसी कां भ्रमसी कां ॥ कंटकवनीं श्रमसी कां ॥धृ०॥
श्रीहरिपद मकरंदीं ॥ निश्वळ राहावें सकल मिलिंदीं ॥१॥
चिद्रस नाना सेवीं ॥ तेथें शोभे संपात्त दैवी ॥२॥
रंगोनि पूर्णानंदें ॥ विचरे हरिपदिं निजसुख छंदें ॥३॥
पद १५७.
अक्षयी ब्रह्मानंद पूर्ण तेव्हां झला ॥ मस्तकीं विदितां संतांच्या चरणरजाला ॥धृ०॥
साधु सज्जन जे समयीं आले घरा ॥ तेचि दिवसीं कोटि दिवाळी दसरा ॥१॥
क्षेमालिंगनीं असिपदिं ऐक्य झालें ॥ परात्परतर सुख तें न बोलवे मज बोले ॥२॥
दयाघन ते विद्वज्जन कृपाद्दष्टी ॥ करिती दीन जनावरि स्वात्मसुखामृत-वृष्टी ॥३॥
चरण प्रक्षाळुनियां तीर्थ घेतां तेथें ॥ पुनीत व्हावया पातलीं सकळहि तीर्थं ॥४॥
षोडशोपचार सद्भावें पूजन सांग ॥ सहजीं सहज पूर्ण निजानंदीं रंग ॥५॥
पद १५८.
पुनरपि जन्मा येईन मी ॥ शंकरकिंकर होईन मी ॥धृ०॥
जन्मुनि सांब सदाशिव ह्र्दयीं ॥ नित्य निंरतर ध्याईन मी ॥१॥
शिव स्मरतां जिव शिवमय होती ॥ दिव्य यदर्थीं देईन मी ॥२॥
सहज पूर्ण निजरंगें रंगुनि ॥ अक्षयीं शिवपद घेईन मी ॥३॥
पद १५९.
जिवलग बंधू तो बंधू तो ॥ करुणामृत सिंधू तो ॥धृ०॥
हरि गुरुभजनीं लावी ॥ विहिताचरणीं मानस गोवी ॥१॥
सदय ह्रदय निष्कपटी ॥ दावी चित्तंतु विश्वपटीं ॥२॥
रंगवुनि निजरंगें ॥ विभाग देतो लक्ष नि जांगें ॥३॥
पद १६०.
धिग् धिग् बंधु तो बंधु तो ॥ प्रकट कपटसिंधु तो ॥धृ०॥
अविहित कर्माचरणीं ॥ आवडी लावित अंत:करणीं ॥१॥
विमुख हरिगुरुभजनीं ॥ विकल्प वाढवितो दिनरजनीं ॥२॥
रंगेना निजरंगें ॥ शाश्वत सुख मानित तनुसंगें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP