पदसंग्रह - अर्जदास्त
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
स्वस्तिश्री नृपशालिवाहन शके १६०५ आषाढ वद्य ५ गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस अयोध्याधीश श्री राजा राम छत्नपती अनंत ब्रह्मांडनायक यांनीं आज्ञापत्र राजश्री निवाजीपंत डेकदार मौजे देहगांव. मामले पंचा. यांसी आज्ञापत्र ऐतिजे तुम्ही. न पाठविली तेथें. मनाजी कामक्रोधादिक आसुरी सेना पुंड पाळेगार मेलवून गांव मारतो, वसाहत होऊं देत नाहीं ॥ ब्रह्मपुरीचा मार्ग चालों दते नाहीं त्यामुळें मुलूख वैरावा पडला, गांवची खराबी जाहली ॥ बि. तपसील ॥ रसनापुरकरांची कुळवाडी बसली ॥ कानगांवकर ऐकेनासा जाहला, नाकलगांव ओस पडला, डोळसगांवकर आपपर विचारीनासा झाला ॥ लिंगापुरकर स्थानभ्रट जाहला, गांडापुरकर धीर धरीत नाहीं. ऐसा कित्येक गांवचा गांव वदलला, तमाम साहेब कामाची खराबी होत चालली ॥ तेव्हां महाराज इतराजी होऊन तलब पाठवून नेऊन लक्ष चौर्यायशी बंदींत घालतील तरी माझा इलाज काय ॥ म्हणोन अर्जदास्त पाठविली ॥ त्यावरून तुम्हांवर साहेब मेहरबान होऊन मनाजी देशमुख वगैरे यांस तंबी पोंचावयास सरनोबत आत्मानात्मविवेक पंत प्रधान व स्वानुभव सोनापती व प्रबोध सर लष्कर यांसमागमें वितरागवीर दैवी संपदा देऊन ताबडतोबीनें रवाना केली आहेत हे मौजै मजकुरीं पावतांच अवघे पुंड पाळेगार मारले जातील ॥ जेरजबरदस्त करून यांस सन्मार्गीं लावतील, वर्णाश्रमविधिनें साधन चतुष्टयसंपन्न होऊन सत्समागमीं लागोन तापत्रयीं तापोन नवविध भजनीं लागोन मुमुक्षु-दशेस येऊन तुह्मांस अनन्य शरण होऊन वश्य होतील तेणें रयत आबादान होईल. मनाजीपंत वगैरे आसुरी पाळेगार साम्यतेस येतील तेव्हां साहेबकाम सुरळीत चांलोन ब्रह्रापुरीचा मार्म चालों लागेल. तरी तुम्ही आपली खातरजमा राखोन साहेब कामास रुजू राहणें ह्मणजे केली सेवा मजुरा असे हुजूर आलिया बंध मोक्षातीत शाश्वत पद इनाम दिलें जाईला ॥ सहज पूर्ण निजानंदं रंगोन साहेभु कामास तत्पर असणें ॥ जाणिजे लेखनालंकार ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP