मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५९१ ते ५९५

पदसंग्रह - पदे ५९१ ते ५९५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५९१.
हरिविण क्षण तो शीण मना रे ॥ध्रु०॥
मदनमनोहर समपद सुंदर ॥ शंखचक्रपीतांबरधारी ॥१॥
त्निभुवननायक निजसुखदायक ॥ दीनानाथ स्वभक्तकैवारी ॥२॥
सहज पूर्णरंग निजानंद अभंग ॥ केवळ भूवैकुंठ पैं पंढरी ॥३॥

पद ५९३. [काशीराजकृत]
श्रीरंग रंगा ये रे रे रे ॥ध्रु०॥
आवरणभंग करुनियां माझ्या प्रत्यया तूं ये रे ॥ निर्विकार अज शाश्वत सुकमय निजात्मदर्शन दे रे ॥१॥
निजानंद घन ब्रह्म सनातन अविष्ठाना ने रे ॥ भेदाभेदविवर्जित स्वरुपीं कवळुनि समुळीं घे रे ॥२॥
निजरंगें रंगवुनी माझें मीपण तूंचि हो रे ॥ श्रीरगानुजननुज लवणकण चित्‌-उदधी पावो रे ॥३॥

पद ५९४.
विरळा या मानवलोकीं भक्तराज तो रे ॥ स्वानंदसदनीं सद्नुरु भजनें राजतो रे ॥
निष्काम योगयुक्त ॥ निरहंकृति जीवन्मुक्त ॥ सहजीं सहज तो रे ॥ध्रु०॥
परमामृत सिंधुतनया गुरुभक्ति इंदिरा रे ॥ दैवी गुण घेवुनि आली ह्रदयमंदिरा रे ॥
परब्रह्मपरायण ॥ नररुपें नारायण ॥ नव्हे मनुज तो रे ॥१॥
गंगा मिळोनी मिळणी नुबगे सागरा रे ॥ शिव होउनि शिव भजती जैशा जळगारा रे ॥
अद्वैतबोधें मन जाहलें चैत न्यघन ॥ तरुचें बीज तो रे ॥२॥
निजरंगें रंगुनि सर्व संगीं अलिप्त रे ॥ प्रकट ना गुण आत्मलाभें संतृप्त रे ॥
कर्पूर दीप दोन्हीं नुरवुनि चिद्भुवनीं ॥ निजीं निजतो रे ॥३॥

पद ५९५.
सच्चिदानंदकंदस्वरुपा श्रीरंगा रे ॥ निर्गुण निर्विकारा मुनिमानसभृंगा रे ॥
अव्यय परात्परा ॥ परिपूर्ण विश्वाधारा ॥ नित्य नि:संगा रे ॥ध्रु०॥
कार्यकारणातीता ॥ व्याप्य व्यापका रे सत्य ज्ञानानंता ॥
निज निष्कळंका रे ॥ निर्लेपा श्रुतिसारा ॥ निष्कंपा निराकारा ॥ दीनोद्धारका रे ॥१॥
अनंतकोटी ब्रह्मांडनायका रे ॥ श्रीगुरुवर्या निजसौख्यदायका रे ॥
निजानंदरंगा ॥ अक्षयीं अभंगा ॥ अनेकीं एका रे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP