मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४८१ ते ४८५

पदसंग्रह - पदे ४८१ ते ४८५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४८१. [चा. सदर.]
ये ये काळीं वनमाळी तमाळनीळा ॥ करुणासिंधु दिनबंधु गोकुळपाळा ॥ध्रु०॥
द्रौपदिबाळा कर चरण प्रक्षाळूनी ॥ उभी ठेली सम्मुख वृंदावनीं ॥
अष्टै भावें करुनियां नमनीं ॥ श्रीहरि तें बोभाय याज्ञसेनी ॥१॥
ये मेघ:शामा भक्तकामकल्पद्रुमा ॥ अवाप्तकामा विद्वज्जनमनविश्रामा ॥
अगणित महिमा शेषरमा नेणति सीमा ॥ सुखैकधामा पुरुषोत्तम सद्नुणग्रामा ॥२॥
मध्यरात्रीं दुर्वासऋषीराय ॥ लक्ष संख्या घेउनियां द्विजसमुदाय ॥
गेला गेला स्नानासि करूं मी काय ॥ अन्न कैंचें म्यां करणें कवण उपाय ॥३॥
तपोधन ते कोपिष्ट बहू ब्राह्मण ॥ शापुनि भस्म करुनियां घेतिल प्राण ॥
नको पाहूं मांडलें अति निर्वाण ॥ उडी घाली नलगतां अर्ध क्षण ॥४॥
टाकुनि मागें गरुडा आणि मन पवनासी ॥ नकळत सहसा या चतुर्दश भुवनासी ॥
धांवोनि यावें त्वां सत्वर द्वैतवनासी ॥ धांवा करितां जाणवलें जगजीवनासी ॥५॥
ऐसा धांवा ऐकतां कमळाकांतें ॥ भोजनसमयीं लोटिलें पात्र स्वहस्तें ॥
धांवोनि आला सत्वर द्वैतवनातें ॥ द्रौपदिनें कुरवंडी केली जीवितें ॥६॥
धर्म भीमार्जुन नकुल आणि सहदेव ॥ हरिपदपद्मीं षट्‌पद ते झाले सर्व ॥
द्रौपदी ह्मणे उदयासि आलें दैव ॥ अनंत पुण्यें जोडला कमलाधव ॥७॥
कमळाकांता अच्युतानंत मुकुंदा ॥ संकट वारीं कैवारिया गोविंदा ॥
मानसमोहना श्रीकृष्णा आनंदकंदा ॥ पूर्णरंगा नि:संगा निजानंदा ॥८॥

पद ४८२. [आत्यास्वामीकृत]
भावचि कारण रे तरावया ॥ध्रु०॥
तरणोपाय असाधारण रे ॥ मर्दित सिंह जसा वारण रे ॥१॥
नलगे कांहों जारण मारण ॥ कर्ता हा भवशत्रुविदारण ॥२॥
पूर्ण रंग हा जगदुद्धारण ॥ करिल नि:संशय संशयवारण ॥३॥

पद ४८३.
सदय ह्रदय नर तोचि हरी ॥ध्रु०॥
सर्व भूर्ती भगवंत सनातन ॥ जापुनियां सम भाव धरी ॥१॥
घ्राणविना सुंदर तनु.कैशा ॥ ज्ञान कळा सकळा विवरी ॥२॥
पूर्णानंदपदीं निज रगों ॥ रंगुनियां सम भाव धरी ॥३॥

पद ४८४.
येईं येईं वो गुरु माउलिये ॥ध्रु०॥
प्रेम-पान्हा मज देई तूं वो ॥ ब्रह्मसनातन गाउलीये ॥१॥
निर्विकल्प-कल्पलते श्रीदेवदत्ते ॥ संसारस्रांता साउलिये ॥२॥
निज रंगें नि:संग अभंगे ॥ धांव पावें माझे आउलिये ॥३॥

पद ४८५.
श्रीराम जयराम जय जय राम ॥ध्रु०॥
त्नयोदश वर्णी मंत्र हा वर्णीं ॥ पावे तो शाश्वतपद निजधाम ॥१॥
नारद वाल्मिक जनक शुकादिक ॥ मुनिजनविश्राम ॥२॥
सच्चिद्धन श्रुतिसार परात्पर ॥ पूर्ण रंग अज अव्यय नाम ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP