पदसंग्रह - पदे ४६ ते ५०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ४६. (ज्योतिषी)
कार्यसिद्धि झाली परिपूर्ण एक लक्ष सुवर्ण ॥ मुद्रा हे लाधली अखंड चैतन्यवन ॥धृ०॥
सद्नुरु ज्योतिषी श्रीरंग सोडुनि पंचांग ॥ मुहूर्त दिधला अक्षयी नित्य अभंग ॥१॥
वारुनि दुर्विषय विषयोग जन्ममृत्युयोग ॥ काम काळ राहु डावलिला क्रोव वार भोग ॥२॥
अहंममता वैधृती व्यतिपात यांचा करुनि नि:पात ॥ कल्पना कल्याणी ढाळिली तोचि शुद्ध मुहूर्ता ॥३॥
राग द्वेष आडळ भ्रमण चुकवुनि जाण ॥ आशा तृष्णा वासना योगिनी पाठीं घातल्या पूर्ण ॥४॥
प्रबोधचंद्र हा सम्मुख घेतला देख ॥ घबाड जोडलें तेणें मी पावलों सुख ॥५॥
अमृतसिद्धियोग स्वयंभ अलभ्य लाभ ॥ अनहत दुंदुभीच्या नादें कोंदलें नभ ॥६॥
पावुनि निज निर्गुण पाटण निजानदें पूर्ण ॥ रंगुनि देशिकरायाचे वंदिले चरण ॥७॥
पद ४७. (कर्णधार)
धांवें पावें कर्णधारा रे निर्विकारा रे ॥ देवा देशिकराया ॥
भवपुरीं बुडतों मी ये काळीं मायाजळीं येईं पार कराया ॥धृ०॥
दुस्तरतर अतिचंचळ जळ तुंबळ कांहा केल्या तुटेना ॥ मगरी आशा तृष्णा कल्पना दुर्वासना यांची मिठी सुटेना ॥
यांनीं मज पाताळीं बुडवितां कोण्ही सोडविता तुजविण दिसेना ॥ लक्ष चौर्यायशीं आवर्तीं मिथ्या विवर्तमाजीं जळचरें नाना ॥१॥
रज तम हे दोन्ही दुर्गुण महा दारुण नक्र वक्र सदांही ॥ काम क्रोधादिक सपे रे यांचा दर्प रे सोसवेना कदांही ॥
परस्परें मद मीन मिसळती लाटा उसळती स्वर्गपर्यंत पाहीं ॥ जन्म जरा आणि मरण संसरण पंक लागला देहीं ॥२॥
अनुकंपा ही नौका घेउनि वेगीं येऊनी मज काढुनि नेईं ॥ माया नदी मृगजळवत् करुनि त्वरीत सुख शाश्वत देईं ॥
नावाडीया गुरुनायका सुखदायका यश निर्दोष घेईं ॥ सहज पूर्ण निजरंगा रे नि:संगा रे करुणाकर तूं होईं ॥३॥
पद ४८. (महावीर)
ओलर आलेर महावीर संत पूर्णब्रह्म मूर्तिमंत ॥ जगदोद्धारी पतीतपावन विजनविहारी पायीं तोडर गर्जत ॥धृ०॥
शुद्धसत्व सुंदर शामकण वारु पालाणिला साधनयुक्त ॥ द्दढनिश्चयें त्यावरी शोभति राजयोगी श्रुद्ध बुद्ध नित्यमुक्त ॥
अष्टहि भावें प्रेम सिले ल्याले आंगीं मुकुट मस्तकीं अव्यक्त ॥ ज्ञानखडग विवेक वोडण झडके हातीं परम शूर भगवद्भक्त ॥१॥
समरंगणीं संनद्ध बद्ध वितरागें ते उभे पूर्ण निज निर्धारें ॥ हमी नारायण नामें करिती सिंहनाद अखंड सारविचारें ॥
ईक्षणमात्नें अनित्य परदळ निवटुनि वेगीं विजयी झाले नवविध भारें ॥ बोध अनुभव हस्ती मस्त झुलताती शृंघारिले साळंकारें ॥२॥
देहादिक भुवनत्रय विषय तृणप्राय ज्यांचे द्दष्टिसी भासत ॥ पुढील पाउल मागें सहसा न ठेविती झाले जीवशिवातीत ॥
सर्वस्वें रक्षिती शरण आले त्यांसी भक्तवत्सल दयावंत ॥ निजरंगें रंगले या रणभूमि - आंत विदेहत्वें विचरत ॥३॥
पद ४९.
हे मज कोणें सांगितलं हें मज कोणें सांगितलें ॥ नकळत कळतां घडलें पूर्वीं हो झालें तें झालें ॥धृ०॥
विषवत् विषय पियुषवत् मानुनी सेवुंका दिन रजनीं ॥ अहंममता संगें कां होऊं मोह - मदिरा - पानीं ॥
दुष्कर्माचरणीं रत हौनि ह्मणवूं कां अज्ञानी ॥ जन्ममरणदु:खाच्या कोटी भोगूं नाना योनी ॥१॥
जननीजठरीं गर्भवासीं मळमूत्रीं नव मास ॥ नाकीं तोंडीं जंतु किडे कोंडे श्वासोश्वास ॥
मेद-मांस-रक्ताच्या आधणीं उकडे रात्रदिवस ॥ प्रसूतिकाळिंची व्यथा सोसवेना उपजे त्रास ॥२॥
क्षणभंगुर जड द्दश्य विकारीं आदि मध्यंतीं ॥ पंचभुतात्मक स्थिर चर विवर्त मिथ्या अवघी भ्रांती ॥
देहबुद्धिनें जीव यातें नेणुनि पडले गुंतीं ॥ मोहमदांधपणें फिरती जन्ममरण-आवर्तीं ॥२३॥
आतां विहिताचरणें वरणें सद्नुरुचरण स्मरणें ॥ साधन चतुष्टयें शुद्ध सत्व अंत:करणें ॥
नवविध भजनें करुनी दुर्जय षड्रिपुंतें संहरणें ॥ पावुनि दुर्लभ मानवि तनु हा भवसागर नच तरणें ॥४॥
हाचि परम पुरुषार्थ करिन मी नि:संशय निज ह्रदयीं ॥ निजानंदें रंगें रंगुनि राहीन सद्नुरुपायीं ॥
स्वात्म सुकामृतसिंधु सनातन सेविन याच उपायीं ॥ जाणत जाणत घेती आत्मघाई हें विष विषयी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP