मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
वसंततिलका

पदसंग्रह - वसंततिलका

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


काया मनें करुनियां पृथुराज भावें ॥ राज्योपचार हरि-अर्चन तें करावें ॥
त्यावीण आणक निकें न गमे तयाला ॥ तो माधवें विजपदाप्रति शीघ्र नेला ॥५॥
ध्यानीं मनीं सतत अक्रुर भक्तराणा ॥ सर्वत्र वंदित असे पुरुषा पुराणा ॥
देखूनि ते विमल वंदन-भक्ति देवें ॥ देऊनियां स्वपद उद्धरिलें सदवें ॥६॥
कायासहीत भुवनत्रय तुच्छ ऐसें ॥ मानूनि दास्य निरहंकृति आत्मतोषें ॥
केलें समारकुमरें गजरें अप रें ॥ त्या दीधलें रघुवरें निजरूप सारें ॥७॥
केय़ूरकुंडलमणी कनकीं विभासे ॥ कल्लोळ बुद्वदतरंगहि नीर जैसे ॥
नानारूपें पट दिसे परि तंतु साचे ॥ सख्यत्व तद्वत जनार्दन अर्जुनाचें ॥८॥
स्वदेहाच्या साह्याप्रति कनक कांता धन शिशू ॥ सुवस्त्रें वैडूर्यें विविध उपभोगादिक पशू ॥
बळीनें त्या देहासह विभव अर्पूनि हरिला ॥ बळें बांधी जैसा चपळ पळतां चोर धरिला ॥९॥
नवविध भजनाची साजिरी रत्नमाला ॥ स्वकिय करुनि कंठीं घालिती जे स्वलीला ॥
निरतिशय सुखाच्या पूर्ण कल्याणधामीं ॥ सहज निजरूपें हो रगले जे आरामीं ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP