तमोभवा श्लेष्मसमुद्भवा च
मन:शरीरश्रमसंभवा च ।
आगन्तुकी व्याध्यनुवर्तिनी च
रात्रिस्वभावप्रभवा च निद्रा ॥५८॥
च. सू. २१-५८ पान २५० सटीक.
निद्राविशेषानाह - तमोभवेत्यादि । तमोभवा इति तमो-
गुणोद्रेकभवा । मन: शरीरश्रमसंभवा तु निद्रा मन:
शरीरयो: श्रमेण क्रियोपरमे सति नेन्द्रियाणि नच मनो
विषयेषु प्रवर्तन्ते, ततश्च निद्रा भवति; श्रमश्चायमनति-
वृद्धो भूरिवाताप्रकोपकोऽभिप्रेत:, तेन श्रमस्य वातजन-
कत्वेन निद्रानाश: किमिति न भवतीति न वाच्यं, दृष्टं
चैतद्यच्छ्रान्तानां निद्रा भवतीति । आगन्तुकी रिष्टभूता ।
व्याध्यनुवर्तिनी सान्निपातज्वरादिकार्या । रात्रिस्वभावात्
प्रभवतीति रात्रिस्वभावप्रभवा । दिवा प्रभवन्ती तु निद्रा
तम:प्रभृतिभ्य एव भवति ॥५८॥
च. सू. २१-५८ टीका
रात्रिस्वभावप्रभवा मता या
तां भूतधात्रीं प्रवदन्ति तज्ज्ञा: ।
तमोभवामाहुरघस्य मूलं
शेषा: पुनर्व्याधिषु निर्दिशन्ति ॥५९॥
च. सू. २१-५९ पान २५०
आसु निद्रासु प्रशस्तां निन्दितां चाह रांत्रीत्यादि । भूतानि
प्राणिनो दधाति पुष्णातीतिं भूतधात्री, धात्रीव धात्री ।
अघस्य पापस्य मूलमिति कारणं; तमोगृहीतो हि सदा
निद्रात्मकत्वेनानुष्ठेयं सद्वृत्तं न करोति, ततश्चाधर्मोत्पाद: ।
व्याधिष्विति शारीरव्याधिषु; श्लेष्मादयो व्याधय एव
तेषु च भूताअ निद्रा व्याधिरुपैव । आगन्तुकी चासाध्यव्या-
धिमवा च स्वयमप्यसाध्यभूता व्याधिरुपा, तेन तां च
व्याधिषु मध्ये निर्दिशन्ति; किंवा व्याधिष्वाधारेषु निर्दि-
शन्तीत्यर्थो ज्ञेय: ॥५९॥
निद्रेचे स्वरुपभेदाने ६ प्रकारें वर्णन केलेले आहे. रात्रीस्वभावप्रभा निद्रा ही रात्रीच्यावेळीं नैसर्गिकपणें उत्पन्न होणारी असून तिचे स्वरुप पूर्णपणे प्रकृत असें असते. ही निद्रा जीवनाचे धारण करणारी, शरीराचे पोषण करणारी अशी आहे. म्हणून हिला भूतधात्री असे म्हणतात. निद्रेचे जे इतर ५ प्रकार तें मात्र विकृतीचे निदर्शक असून रोगस्वरुप आहेत. हें पांच प्रकार मनोंदोषापैकी तमोगुणाची वाढ झाल्याने, कफप्रकोपाने, मन व शरीर यांना थकवा आल्यानें, व्याधीमध्यें उपद्रव म्हणून व विषादि आगंतुक कारणानी अनुक्रमें उत्पन्न होतात. यातील थकव्यामुळें उत्पन्न होणारा तिसरा प्रकार जवळ जवळ प्रकृतासारखाच मानता येईल.
यदा तु मनसि क्लान्ते कर्मात्मान: क्लमान्विता: ।
विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिति मानव: ॥३५॥
च. सू. २१-३५ पान २४७
संप्रति प्रस्तावागतं स्थौल्यकार्श्यचिकित्साप्रधानभूतं
स्वप्नं निद्रारुपं सर्वतो निरुपयति - यदा त्वित्यादि ।
मनसीति अन्त:करने; किंवा मनोयुक्त आत्मा मन इत्यु-
च्यते, तस्मिन् क्लान्त इति निष्क्रिये । कर्मात्मान इति
इन्द्रियाणि ।
क्लमान्विता: क्रियारहिता: । विषयेभ्य: रुपा-दिभ्य: ।
मनसोऽप्रवुत्तेन्द्रियाण्यपि न प्रवर्तन्त इति भाव: ।
तदा स्वपितीति स्वप्नगुणयुक्तो भवति; स्वप्नश्च निरिन्द्रिय-
प्रदेशे मनोवस्थानम् ।
किंवा कर्मात्मान इति संसार्यात्मान: ।
मनसि क्लान्ते आत्मान: क्लान्ता भवन्ति, मनो-
धीनप्रवृत्तित्वादात्मनां; ततश्च मनोनिवृत्त्या आत्मानोऽपि
न विषयान् गृह्वन्ति, इन्द्रियाणि चात्मनोऽप्रवृत्त्यैव न
प्रवर्तन्ते ॥३५॥
दिवसभर कराव्या लागणार्या उद्योगामुळे मन व इंद्रिये थकून निष्क्रिय होऊ लागतात. मन व इंद्रियांकडून विषयांचें ग्रहण होत नाही. न्यायशास्त्राप्रमाणे मन `पुरितती' नांवाच्या एका विशिष्ट नाडीमध्यें प्रविष्ट होते त्यामुळे त्याचा इंद्रियाशी असलेला संबंध नाहीसा होतो व झोप लागते. शरीराच्या नैसर्गिक स्थितीमध्यें अन्नाप्रमाणेच निद्रेचीही आवश्यकता प्रतिदिनीं असते आणि तदनुरुप रात्रीच्या वेळी मनुष्य झोप घेतो. निद्रा ही प्रकृत स्थितीतही शरीरदोष कफ व मानसिकदोष तम यांच्या चयावस्थेत उत्पन्न होते रात्री असणारा प्रकाशाचा अभाव आणि शैत्य हे भाव तम व कफाच्या चयांस कारणीभूत होऊन निद्रेच्या उत्पतीस सहायक होतात. संचित झालेले तम व कफ हे दोष संज्ञावह स्त्रोतसांचे जागरण करुन मन इंद्रियांनां विषय ग्रहणासाठी प्रत्यवाय उत्पन्न करतात आणि मग स्वाभाविकपणे निद्रा येते. या स्वाभाविक निद्रेतही शरीराच्या व मनाच्या प्रकृति भेदानें कमी अधिक फरक पडतो कफ प्रकृतीच्या व तमोगुणी मनुष्यास केव्हांही दिवसा रात्री झोंप येते, ती सावध नसते व दीर्घकाळपर्यन्त लागते. वातप्रकृतीच्या व रजोगुणी मनुष्यास लागणारी निद्रा अनियमित स्वरुपाची असते अशा व्यक्तीची झोप मधून मधून सारखी चाळवते झोप लवकर लागत नाही व झोप नाहिशीं होण्यास थोडेसही कारण पुरते. पित्त प्रकृतीच्या व सत्त्वगुणी मनुष्यास झोंप थोडी असते व तेवढीं त्या व्यक्तीस पुरते, (सु. शा. ४-३३)
निद्रायत्तं सुखं दु:खं पुष्टि: कार्श्य बलाबलम्;
वृषता क्लीबता ज्ञानमज्ञानं जीवितं न च ॥३६॥
अकालेऽतिप्रसड्गाच्च न च निद्रा निषेविता ।
सुखायुषी पराकुर्यात् कालरात्रिरिवापरा ॥३७॥
सैव युक्ता पुनर्युड्क्ते निद्रा देहं सुखायुषा ।
पुरुषं योगिनं सिध्द्या सत्या बुद्धिरिवागता ॥३८॥
सटीक च. सू. २१-३६ ते ३८ पान २४७
संप्रति विधिना सेविताया निद्राया गुणमविधिना
चदोषमाह - निद्रायत्तमित्यादिना न चेत्यन्तेन ।
अत्र च सुखादिविधिसेवितनिद्राफलं, दु:खादि
त्वविधिनिद्राफलम् ।
एतदेव विभजते - अकाल इत्यादि ।
अकाल इति दिनादौ निद्रां प्रति निषिद्धे काले;
अनेन च मिथ्यायोगो निद्राया उक्त: ।
कालरात्रि: कालोषा । सत्या बुद्धि तत्वज्ञानम् ॥३६-३८॥
निद्रेचे योग्य निद्रा व अयोग्य निद्रा असे दोन प्रकार आहेत. योग्य निद्रेमुळें सुख, पुष्टी, बल, पौरुष ज्ञान, व आयुष्य यांचा लाभ होतो. अयोग्य निद्रेचें स्वरुपभेदानें तीन प्रकार होतात. अवेळीं झोंपणें, अतिप्रमाणांत झोंपणें, व मुळीच झोंप न घेणें या निद्रेच्या मिथ्यायोगामुळें आयुष्याचा व सुखाचा कालरात्रीनें व्हावा तसा नाश होंतो. या अयोग्य निद्रेमुळें दु:ख, कृशता, दौर्बल्य नपुंसकत्व अज्ञान हीं वाढतात अतिरेकाने मृत्यूहि येतो. सिद्धी ज्याप्रमाणे योग्यास तत्वज्ञान मिळवून देते त्याप्रमाणे योग्यप्रकारानें घेतलेली निद्रा मनुष्यदेहास दीर्घायुष्य व सुख यांचा लाभ करुन देते.
निद्रानाश
निद्रानाशोऽनिलात् पित्तान्मनस्तापात् क्षयादपि ।
संभवत्यबिघाताच्च प्रत्यनीकै: प्रशाम्यति ॥४२॥
निद्रानाशेऽभ्यड्गयोगो मूर्ग्धि तैलनिषेवणम् ।
गात्रस्योद्वर्तन चैव हितं संवाहनानि च ॥४३॥
शालिगोधूमपिष्टान्नभक्ष्यैरैक्षवसंस्कृतै: ॥
भोजनं मधुरं स्निग्धं क्षीरमांसरसादिभि: ॥४४॥
रसैर्बिलेशयानां च विष्किराणां तथैव च ।
द्राक्षासितेक्षुद्रव्याणामुपयोगो भवेन्निशि ॥४५॥
शयनासनयानानि मनोज्ञानि मृदूनि च ।
निद्रानाशे तु कुवींत तथाऽन्यान्यपि बुद्धिमान् ॥४६॥
सु. शा. ४-४२ ते ४६ पान ३५९,
वाताच्या व पित्ताच्या प्रकोपामुळें वातपित्तप्रकोपक आहारविहारामुळें वा मानसिक ताप, धातुक्षय व अभिघात यामुळें झोंप न येणे हा विकार होतो. या निद्रानाशामध्ये आलस्य, अंगगौरव, नेत्रदाह, अरति, क्षुधामांद्य, मलावष्टंभ, शिर:शूल अशी लक्षणें असतात. निद्रानाशावर उपचार म्हणून डोक्यास व सर्व शरीरांस स्नेहाने अभ्यंग करणें, कर्णपूरण करणे, सर्व शरीराचे सुखकर होईल असे मर्दन करणे, पाय दाबणे, गव्हाचे पदार्थ साखर घालून खाणे, दूध व मांसरसाचा उपयोग करणे, शय्या मृदु व चांगली असणे इ० उपचार करावेत.
अतिनिद्रा
अतिनिद्रेला कफप्रकोप, तमोगुणाचे आधिक्य मेदोवृद्धि, म्हशीचे दूध, दही, मिष्टान्न सेवन, मार्गक्रमण, अशीं कारणें असतात.
कायस्य शिरसश्चैव विरेकश्छर्दनं भयम् ।
चिन्ताक्रोधस्तथा घूमो व्यायामो रक्तमोक्षणम् ॥५५॥
उपवासोऽसुखा शय्या सत्त्वौदार्य तमोजय: ।
निद्राप्रसड्गमहितं वारयन्ति समुत्थितम् ॥५६॥
एत एव च विज्ञेया निद्रानाशस्य हेतव: ।
कार्यं कालो विकारश्च प्रकृतिर्वायुरेवच ॥५७॥
च. सू. २१-५५ ते ५७ पान २५०.
अतिनिद्रेवर उपचार म्हणून पुढील गोष्टी कराव्या -
विरेचन, शिरोविरेजन, वमन, रक्तमोक्ष, भय, चिंता, क्रोध, मनोविनोदन (गाणे, नाटक, गोष्टी), धूम, अतिव्यायाम, अतिव्यवाय, उपवास, असुखकर शय्या सत्वगुणाची वाढ, तमोजय या कारणानी निद्रा उणावते.
दिवास्वाप
ग्रीष्मवर्ज्येषु कालेषु दिवा स्वप्नात् प्रकुप्यत: ।
श्लेष्मपित्ते दिवास्वप्नस्तस्मात्तेषु न शस्यते ॥४४॥
मेदस्विन: स्नेहनित्या: श्लेष्मला: श्लेष्मरोगिण: ।
दूषी विषार्ताश्च दिवा न शयीरन् कदाचन ॥४५॥
हलीमक: शिर:शूलं, स्तैमित्यं गुरुगात्रता ।
अड्गमर्दोऽग्निनाशश्च प्रलैपो हृदयस्य च ॥४६॥
शोफारोचक हृल्लासपीनसार्धावभेदका: ।
कोठारु पिडका: कण्डू स्तन्द्रा कासो गलामया: ॥४७॥
स्मृतिबुद्धिप्रमोहश्च संरोध: स्त्रोतसां ज्वर: ।
इंद्रियाणामसामर्थ्य विषवेगप्रवर्त (र्ध) नमऽ ॥४८॥
भवेत्रृणां दिवास्वप्नस्य हि तस्य निषेवणात् ।
तस्माद्धिताहितं स्वप्नं बुद्ध्वा स्वप्यात सुखं बुधा ।
च. सु. २१ आ. ४४-४९, पृ. २४८
निद्रेपैकी दिवास्वाप हा मूलत: वर्ज्य आहे. ग्रीष्म ऋतु व्यतिरिक्त इतर ऋतूंत केव्हांही दिवसा झोंपणे योग्य नाही. दिवसा झोपल्यामुळे कफ आणि पित्त यांचा प्रकोप होतो. मेदस्वी, स्निग्ध द्रव्यांचे सेवन करणारे, कफ प्रवृत्तीचें, कफप्रधान रोगांनी पीडलेले वा दूषी विषाची बाधा झालेले यानीं चुकूनसुद्धां दिवसा झोंप घेऊ नयें. दिवसा झोंप घेतल्यामुळे हलीमक, शिर:शूल अंग जड होणे, अंगमर्द, अग्निमांद्य, हृदयोलेप, शोथ, अरोचक, हृल्लास, पीनस, कोठ, पीडका, कडू, तंद्रा, कास, गळ्याचे रोग, प्रमोह, स्त्रोतोरोध, ज्वर, इंद्रियदौर्बल्य व विषाच्या परिणामांची वृद्धी असें विकार होतात. दिवसा झोंपणे हे स्वस्थवृत्ताच्या सामान्य नियमाप्रमाणे वर्ज्य असले तरी पुढें वर्णन केलेल्या विशिष्ट परिस्थितींत एक उपचार म्हणून दिवसा झोंप घेण्यास अडचण नाही.
गीताध्ययनमद्यस्त्रीकर्मभाराध्वकर्शिता: ।
अजीर्णिन: क्षता: क्षीणा वृद्धा बालास्तथाऽबला: ॥३९॥
तृष्णातीसारशूलार्ता: श्वासिनो हिक्किन: कृशा: ।
पतिताभिहतोन्मत्ता: क्लान्ता यानप्रजागरै: ॥४०॥
क्रोध शोक भयक्लान्ता दिवास्वप्नोचिताश्च ये ।
सर्व एते दिवा स्वप्नं सेवेत सार्वकालिकम् ॥४१॥
धातुसाम्यं तथा ह्येषां बलं चात्युपजायते ।
श्लेष्मा पुष्णाति चाड्गानि स्थैर्यं भवति चायुष: ॥४२॥
ग्रीष्मे त्वादानरुक्षाणां वर्धमाने च मारुते ।
रात्रीणां चातिसंक्षेपाद्दिवा स्वप्न: प्रशस्यते ॥४३॥
च. सू. २१ आ. ३६-४३ पान २४८.
गायन, अभ्यास, मद्यपान, मैथुन, श्रम, ओझी वहाणे, चालणे यामुळे क्षीण झालेले लोक, अजीर्ण झालेले, क्षत पडलेले, वृद्ध, बाल, दुर्बल, तृष्णा, अतिसार, शूल, हिक्का, या व्याधीनी पीडीत, कृश, पडलेले, मार लागलेले, वेडे, प्रवास व जागरण यामुळे थकलेलें, क्रोध, शोक, भय यानीं मनाला व्याकुळता आलेले हे सर्व दिवसा झोंप घेऊं शकतात. दिवसा झोपेमुळे वाढलेल्या कफामुळे वरील व्यक्तिंच्या शरीराचे पोषण होऊन ते स्थिर होते, आयुष्य वाढते, बळ मिळते, आणि धातू साम्यावस्थेंत येतात. ग्रीष्म ऋतूंतही दिवसा झोंप घ्यावी कारण त्यावेळी आदान काल असल्याने रात्री लहान असतात व रुक्षतेमुळे वायूचा चय होत असतो.
निद्रा सात्म्यीकृता यैस्तु च यदि वा दिवा ॥
दिवा रात्रौ च ये नित्यं स्वप्नजागरणोचिता: ।
न तेषां स्वपतां दोषो जाग्रतां वाऽपि जायते ॥४१॥
सु. शा. ४-४१ पान ३५९.
रात्री जागू नये व दिवसा झोपू नये हे सामान्यपणें स्वस्थवृत्तास धरुन असलें तरी, ज्यांना परिस्थितीमुळे उद्योगधंद्याच्या स्वरुपामुळे वा स्वभावामुळे यापेक्षा वेगळी संवय झालेली असेल त्याच्या बाबतीत रात्री जागल्यामुळे व दिवसा झोंपल्यामुळे फारसा दोष उत्पन्न होत नाही.