रौक्ष्याद्वेगविधाताद्व वायुरन्तरमाश्रित: ।
मूत्रं चरति संगृह्य विगुण: कुण्डलीकृत: ।
सृजेदल्पाल्पमथवा सरुजस्कं शनै: शनै: ।
वातकुण्डलिकां तं तु व्याधिं विद्यात् सुदारूणम् ।
सु. उ. ५८-५-६ पान ७८७
गतिसड्गादुदावृत्त: स मूत्रस्थानमार्गयो: ।
मूत्रस्य विगुणौ वायुर्भग्नव्याविद्धकुण्डली ।
मूत्रं विहन्ति संस्तम्भमड्गौरववेष्टनै: ।
तीव्ररुड्मूत्रविट्सड्गैर्वातकुण्डलिकेति सा ।
च. सि. ९-३९, ४० पान १७२५
वेगविधारण, रुक्षता या कारणांनीं प्रकुपित झालेला वायु बस्तिमध्यें विकृती, पावून त्याची अनुलोमनाची शक्ति नाहिशी होते. त्यामुळें बस्ति या अवयवाला शैथिल्य येऊन मूत्र संग्रहित होऊं लागतें. थोडें थोडें मूत्र सावकाश सावकाश बाहेर येतें त्यावेळीं वेदना होतात. तसेंच विट् संग असतो मलप्रवृत्तीचें वेळीं कुंथतांना थोडेसें मूत्र बाहेर येतें आणि बस्ति भागी स्तंम्भ, गौरव उद्वेष्ट (आवळून धरल्यासारखें वाटणें) तीव्र शूल अशीं लक्षणें होतात.
चिकित्सा :-
अभ्यंग, अवपीडकृत, अवगाह स्वेद, निरुह अनुवासन बस्ति, उत्तरबस्ति, असें उपचार करावे. कुचला, पिंपळीमूळ, शिलाजतु, सुवर्ण, रौप्य, त्रिवंग, गोक्षुर, भल्लातक, चंद्रप्रभा-वसंत कुसुमाकर अशीं औषधें वापरावीं. मीठ वज्य करावें. मूत्रोत्संग, मूत्रजठर, बस्तिकुंडल, मूत्रग्रंथी विड्विघात, मूत्राष्टिला या व्याधीचें वर्णन आमच्या शल्यशालाक्य तंत्र या ग्रंथांत पहावें.