मूत्रवहस्त्रोतस् - मूत्रक्षय
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
रुक्षस्य क्लान्तदेहस्य बस्तिस्थौ पित्तमारुतौ ।
मूत्रक्षयं सरुग्दाहं जनयेताम् तदाह्वयम् ॥१२॥
मा. नि. मूताघाता पान २४५
वात प्रकोप करणारा रुक्षादि आहार, किंवा धातुक्षयामुळें येणारी रुक्षता तसेंच निरनिराळ्या व्याधींमुळें वा अति व्यायाम, अल्प अन्नपान सेवन यामुळें शरीर श्रांत, क्लांत होणें, या कारणांनीं वायु प्रकुपित होऊन, मूत्राचा शोष करतो, मूत्र उत्पन्नच होत नाहीं, सर्वांगामध्यें दाह, वेदना, अशीं लक्षणें असतात.
उपद्रव - शोथ
साध्या साध्यता
व्याधि अत्यंत कष्टसाध्य वा असाद्य असतो. च
चिकित्सा: - तृणपंचमूळ, दह्याची निवळ, नारळाचें पाणी, लिंबू पानक, लाजमण्ड. हेमशिलाजतु, गोमूत्र हरितकी , अवगाह स्वेद असे उपचार करावे.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP