मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
मूत्रकृच्छ्र

मूत्रवहस्त्रोतस् - मूत्रकृच्छ्र

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

``मूर्तयतीह कृच्छ्रात्'' (च. चि. २६-३३)

कष्टानें, (पीडायुक्त) अल्प, मूत्रप्रवृत्ति होते या लक्षणांवरुन व्याधीस मूत्रकृच्छ असे म्हणतात.

स्वभाव - दारुण, चिरकाली

मार्ग - मध्यम

प्रकार

`वातेन पित्तेन कफेन सर्वै:
स्तथाऽभिघातै: शकृदश्मरीभ्याम् ॥
तथाऽपर: शर्करया सुकष्टो
मूत्रोपघात: कथितोऽष्टमस्तु ॥ऽ॥
सु. उ. ५९-३ पान ७६२

वातेनेत्यादि । मूत्रोपघातो मूत्रकृच्छ्र एवेत्यर्थ: । अष्टम
इति संख्याकरणं नानाप्रकारस्याप्यश्मरीजस्य मूत्रकृच्छ्र
स्यैकत्वेन ग्रहणमिति प्रतिपादनार्थम् । केचिदुत्तरार्ध-
मीदृशं पठन्ति; शुक्रोद्भवशर्कराया च कष्टं मूत्रस्य कृच्छ्रं
प्रवदन्ति तज्ज्ञा: । इति

वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, पुरीषज, अश्मरीज, शर्कराज व शुक्र शल्याभिधातज असे मूत्र कृच्छ्राचे आठ प्रकार आहेत.

निदान

व्यायामतीक्ष्णौषधरुक्षमद्यप्रसंगनित्यद्रुतष्टष्ठयानात् आनुप-
मांसाध्यशनादजीर्णात्स्युर्मूत्रकृच्छ्राणि नृणां तथाऽष्टौ ॥१॥
मा. नि. मूत्रकृच्छ्र ॥२॥ पान २४१

व्यायाम, तीक्ष्ण द्रव्ये, रुक्ष पदार्थ, मद्यपान, मैथुन, वाहनांतून प्रवास करणे (घोडा हादरे बसणारी गाडी - हल्लीची दुचाकी फटफटी), आनूपमांसभक्षण, अध्यशन, अजीर्ण या कारणांनीं दोष प्रकोप होऊन मूत्रकृच्छ्र हा व्याधी उत्पन्न होतो. चरकाने कषायतिक्त कटु पदार्थ आणि वेगविधारण अशी कारणे अधिक सांगितली आहेत. ( च. चि. २२-५)

संप्राप्ति

पृथड्मला: स्वै: कुपिता निदानै: सर्वेऽथवा कोपमुपेत्य बस्तौ ।
मूत्रस्य मार्ग परिपीडयन्ति यदा तदा मूत्रयतीह क्रुच्छ्रात् ॥१॥
मा. नि. मूत्रकृच्छ्र पान २४१

पक्वाशये कुप्यति चेदपान: ।
स्त्रोतांस्यधोगानि बली स रुद्‍ध्वा ।
करोति विण्मारुतमूत्रसड्गं ।
क्रमादुदावर्तमत: सघोरम् ।
रुग्बस्तिहृत्कुक्ष्युदरेष्वभीक्ष्णं ।
सपृष्ठपार्श्वेष्वतिदारुणास्यात् ॥६॥
आध्मानहृल्लासविकर्तिकाश्च ।
तोदोऽविपाकाश्च स बस्तिशोथ:
च. चि. २६-५.६ पान १४०३

मिथ्याहारविहाराने दोषांची विशेषत: अपान वायूची दुष्टी होऊन अधोगामी असे जे मूत्रवहस्त्रोतस त्यामध्ये संग उत्पन्न होतो. क्रमाक्रमानें वातमूत्र पुरुषांचा रोध इत्यादि लक्षणे उत्पन्न होतात. बस्तिला म्हणजेज उपलक्षणेने सर्व मूत्रवहस्त्रोतसाला शोथ येऊन ही विविध लक्षणे उत्पन्न होतात. संप्राप्तिमधे ``पक्वाशये बस्तिशोथ'' हे सूत्र चरकाच्या त्रिमर्मीय चिकित्सिताध्यामधे आलेले आलें. उदावर्त वर्णन असे प्रकरण या ठिकाणी कल्पिले गेले असले तरी एकूण वर्णनाचा विचार करतां अपानाची दुष्टी व त्यामुळे मर्माच्या ठिकाणीं उत्पन्न होणारी पीडा याची एक प्रकारे संप्राप्तिच सांगण्याचा उद्देश आहे असे स्पष्ट दिसते म्हणून बस्ति (मूत्रवहस्त्रोतस) या अवयवाच्या विकृतिशीं संबद्ध असलेले वर्णन आम्ही येथें घेतले आहे.

पूर्वरुपे

अधोभागी गुरुत्व, मूत्रप्रवृत्तीचेंवेळीं थोडेसे अडखळल्यासारखे वाटणे, वंक्षण बस्ती, नाभी, कुक्षिभागी मूत्रप्रवृत्तीचें वेळीं किंचित् शूल.

रुपे

वातमूत्र गुरुत्व, मूत्रप्रवृत्तीचेंवेळीं थोडेसे अडखळल्यासारखे वाटणे, वंक्षण बस्ती, नाभी, कुक्षिभागी मूत्रप्रवृत्तीचें वेळीं किंचित् शूल.

रुपे

वातमूत्र पुरीषांचा अवरोध, बस्ती कुक्षी, उदर, पार्श्व, पृष्ठ, हृदय या अवयवांमध्यें वेदना, आध्मान, हृल्लास, विकर्तिका (मुत्रप्रवृत्तीचें वेळीं चरचरल्यासारखीं जळजळल्यासारखीं वेदना) अन्न न पचणें अशी लक्षणें होतात.

तीव्रा रुजो वंक्षणबतिस्मेढ्रे
स्वल्पं मुहुर्मूत्रयतीह वातात्
पीतं सरक्तं सरुजं सदाहं
कृच्छ्रांन्मुहुमूत्रयतीह पित्तात् ॥३४॥
बस्ते: सलिड्गस्य गुरुत्वशौथौ ।
मूत्रं सपिच्छं कफमूत्रकृच्छ्रे
सर्वाणि रुपाणि तु सन्निपाता
द्भवन्ति तत् कृच्छ्रतमं हि कृच्छ्रम् ॥३५॥
च. चि. २६, ३४, ३५ पान १४०७

(१) वातज मूत्रकृच्छ्रामध्यें वंक्षण, बस्ती, शिस्न या भागी तींव्रस्वरुपाच्या वेदना होतात, मूत्रप्रवृत्ती वरचेवर थोडीथोडी होते.

(२) पित्तज मूत्रकृच्छ्रामध्यें सदाह सरक्त, सवेदन अशी मूत्रप्रवृत्ती वरचेवर व कष्टानें होते, मूत्राचा वर्ण पीत असतो. सुश्रुतानें मुत्र उष्णस्पर्श हारिद्रवर्ण असते व भाजल्याप्रमाणें आग होते असें सांगितले आहे. (सु. उ, ५९-५)

(३) कफज मूत्रकृच्छ्रामध्यें बस्ति व शिस्न या अवयवांवर शोथ आलेला दिसतो. त्या ठिकाणीं जडपणा वाटतो. मूत्रपिच्छिल असते. सुश्रुतानें मूत्र हें अनूष्ण (शीत) स्निग्ध शुक्ल असें असते व अंगावर रोमांच उभे राहातात असें सांगितले आहे ) सु. ३ ५९-६).

(४) सन्निपातज मूत्रकृच्छ्रांत दोषज मूत्रकृच्छ्रांतील सर्व लक्षणें असतात. सुश्रुतानें मूत्र नानावर्णाचें व दाहशीत रुजायुक्त असते, मूत्रप्रवृत्तीचें वेळी अंधारी येते अतिशय कष्ट होतात असें सांगितले आहे.(सु. उ. ५९-७)

(५०) पुरीषजमूत्रकृच्छ्र
शकृतस्तु प्रतीघाताद्वायुर्विगुणतां गत: ।
आध्मानं च सशूलं च मूत्रसड्गं करोति हि ।
सु. उ. ५९.९. पान ७९२

मलावष्टंभामुळें अपान वायु दुष्ट होऊन आध्मान, शूल व मूत्रसंग अशीं लक्षणें उत्पन्न करतो. मलाच्या मोठया आकाराच्या गाठी बनल्यामुळें त्यांच्या संचितीनें अवरोध होऊन मूत्रमार्गही पीडित होतो व या पीडनाचा परिणाम मूत्रकृच्छ्रांत होतो.

(६) (अश्मरी) शर्कराज मूत्रकृच्छ्र
अश्मरी शर्करा चैव तुल्यसंभवलक्षणे
विशेषणं शर्कराया: श्रृणु कीर्तयतो मम ।
पच्यमानाऽष्मरी पित्ताच्छोण्यमाणा च वायुना ।
विमुक्तकफसंधाना क्षरन्ती शर्करा मता ।
हृत्पीडा वेपथु: शूलं कुक्षावग्निश्च दुर्बल: ।
तया भवति मूर्च्छा च मूत्रकृच्छ्रं च दारुणम् ।
मूत्रवेगनिरस्ताभि: प्रशमं याति वेदना ।
यावदस्या: पुनर्नैति गुडिका स्त्रोतसो मुखम् ।
मा. नि. मूत्रकृच्छ्र ९-१२. पान २४२

पित्ताचा उष्मा व वायूचें शोषण कार्य यामुळें कफाचे थोडे थोडे अंश शुष्कघनं होऊन, बारीक रेतीचें कण दिसावें तसें होतात. सुश्रुतानें ``श्लेष्मणोवयववाभिन्ना शर्करा इति संज्ञिता'' । सु. उ. ५९-१२ असे शर्करेचें कफाधिष्ठितत्व स्पष्टपणें सांगितलें आहे. ही शर्करा वृक्कांतून गविनींत गविनींतून बस्तीत व बस्तीतून शिस्नांतील मूत्रसेकद्वारा बाहेर पडून जाईपर्यंत विविध पीडाकर लक्षणें उत्पन्न करते. हृदशूल, कुक्षीशूल, कंप, मूर्च्छा, मूत्रकृच्छ, अन्नाची इच्छा नसणे अशी लक्षणे होतात. शर्करेचे कण निघून गेले म्हणजे बरे वाटते व पुन्हा शर्करा मूत्रवहस्त्रोसांतून घासत येऊं लागलीं कीं वेदना उत्पन्न होतात.

कदम्बपुष्पाकृतिरश्मतुल्या । श्लक्ष्णा त्रिपुटयप्यथवाऽपि मृद्वी ।
मूत्रस्य चेन्मार्गमुपैति रुध्द्वा । मूत्रं रुजं तस्य करोति बस्तौ ॥३७॥
ससेवनीमेहनबस्तिशूलं विशीर्णधारं च करोति मूत्रम् ।
मृद्‍नाति मेढ्रं स तु वेदनार्तो । मुहु: शकृन्मुञ्चति मेहते च ॥३८॥
च. चि. २६-३७, ३८ पान १४०७

शर्करा हा अश्मरीचाच एक प्रकार असला तरी चरकानें शर्कराजमूत्रक्रच्छाचे अश्म रोजकृच्छ्रापेक्षा वेगळें वर्णन केलें आहे, मात्र स्वतंत्र लक्षणें दिली नाहीत, चरकाचें ``मूत्रस्य चेत् मार्गमुपैर्ति'' हे वर्णन मादवाच्या ``यादवस्या पुनर्नैति, गुडिका स्त्रोतसोमुखं'' या वर्णनाच्यासारखें आहे. निरनिराळ्या आकाराचें बारीक बारीक कण या ठिकाणीं चरकास अभिप्रेत असल्यासारखें दिसतात. या शर्करेमुळें सेवनी शिस्न, बस्ति, या ठिकाणीं वेदना होतात. मुत्राची धार विशीर्ण होते. (खंडित वेडी वाकडी, वेगहीन) शिस्न पिळवटावेसे वाटते, मूत्रप्रवृत्तीचें वेळां मलाचाही वेग येतो. चरकानें वर्णन केलेली ही लक्षणें विशेष महत्त्वाची असून माधवाच्या वर्णनांत त्यांची भर घातली पाहिजे.

अश्मरीज मूत्रकृच्छ्र हा याचाच एक प्रकार आहे. शस्त्र कर्म हा त्याच्यावरील महत्त्वाचा उपचार असल्यानें त्याचें वर्णन आमचा शल्य शालाक्य तंत्रांत पहावे. मूत्रकृच्छ्राचें प्रकार किति मानावें या संबंधी कांहीं मतभेद आहेत. गंगाधरानें आपल्या टीकेंत त्यासंबंधी समन्वय केला आहे.

स्युर्मूत्रकृच्छ्राणीति मूत्रस्य कृच्छ्रेण प्रवृत्तिर्विघात इत्यनर्थान्तरम् ।
तेन सुश्रुते मूत्राघातविकृच्छ्रयोरिति रोगद्वयमुद्दिष्टं कृत्वा मूत्रोप्घातशब्देन
द्वयोरवरोध कृत: । तद्‍यथा ।
वातेन पित्तेन कफेन सर्वै:तथाऽभिघातै: शकृदश्मरीभ्यां तथाऽपर: शर्करया
सुकष्टो मूत्रोपघात: कथितोष्टमस्तु ।
इति शकृत प्रतिघातज इहोक्त: नोक्त:, शुक्रप्रतिघातज: इहापि निर्देशात्
वातादिलक्षणानां वातजपित्तज कफज सन्निपातजाश्मरीज शर्कराजाभिघातजानि
व्याहतशुक्रजं चात्रोक्तं शकृतप्रतिघातजं नोक्तं इति विरोधोनाशंक्य: ।
सुश्रुते ह्यश्मरीजकृच्छ्रे शुक्रजावरोधमभिप्रेत्य शुक्रज मुत्रकृच्छ्रं नोक्तं इह तु तंत्रे
शकृत्प्रतिघातजं वातमूत्रकृच्छ्रेऽवरोधात् न पृथग्‍ उक्तं इति यस्तु व्याख्यातवान
सुश्रुते शर्कराजमूत्रकृच्छ्रं न पठितं इह तु पठितं एषाश्मरी मारुतभिन्नमूर्ति;
स्यात्शर्करामूत्रचयात् क्षरंति इति ।
सुश्रुते च अश्मरी शर्कराचैव तुल्ये संभवलक्षणै: इतिततोश्मरीजेन शर्कराजग्रहणं
इति तत् भ्रांत्या व्याख्यतवान् ।
सुश्रुते हि तथाऽपर: शर्करया सुकष्टो मूत्रोपघात: कथितोऽष्टमस्तु इत्युक्तं अन्यथा
अष्टत्वव्याघात: स्यात् ।
इहापि तंत्रे शर्कराजसहितान्येवाष्टौ पूर्यन्ते तच्च विना सप्त स्यु: इति ।
च. चि. २६-१७ गंगाधर टीकाअ पान ३३०१, ३३०२

माधवनिदानानें शर्कराज मूत्रकृच्छ्राचा अश्मरीज कृच्छ्रामधें समावेश केला आहे तर सुश्रुतानें आपल्या यादींत शर्कराज मूत्रकृच्छ स्वतंत्रपणे उल्लेखले आहे. त्याने शुक्रज मूत्रकृच्छ्र अश्मरीमध्यें गृहीत धरलें आहे. चरकानें शुक्रज अश्मरीज, शर्कराज अशी मुत्र कृच्छे सांगितली असून शकृतज्‍ (पुरिषज) मुत्र कृच्छ्र स्वतंत्र सांगितलें नाहीं.चरकानें ते वातज मूत्रकृच्छ्रांत गृहित धरलेलें असावे.

(७) शुक्रजमूत्रकृच्छ्र

शूकं मलाश्चैव पृथक् पृथग्वा । मूत्राशयस्था: प्रतिवारयन्ति ।
तद्‍व्याहतं मेहनबस्तिशुलं । मूत्रं सशुक्रं कुरुते विबद्धम् ।
स्तब्धश्च शूनो भृशवेदनश्च । तुद्येत बस्तिर्वृषणौ च तस्य ।
च. चि. २६-४२ पान १४०८

प्रकुपित झालेले दोष, शुक्राच्या वेगाचा विघात करुन मूत्रमार्गामध्यें (किंवा मूत्रमार्गाच्या जवळच) शुक्राचा रोध करतात. हे अवरुद्ध शुक्र शिस्न, बस्ति वृषण या ठिकाणी वेदना शोथ उत्पन्न करतें, मूत्र व शुक्र यांचें वहन, नीट होत नाहीं.

(८) अभिघातज

शल्यशालाक्य तंत्रांत बघावें.

एवं सूत्रस्थानोद्दिष्टा अष्टौ मूत्राघाता मूत्रकृछ्र शब्देनेह
निर्दिश्य व्याकृता: । ये तु त्रिमर्मीयसिद्धौ त्रयोदश मूत्रा-
घाता वक्तव्यास्ते सूत्रस्थानेऽसूत्रिता अपि एकादशक्षुद्र-
कुष्ठवदन्तर्भावनीया: ।
मूत्राघातमूत्रकृच्छयोश्चायं विशेष: यन्मूत्रकृच्छे मूत्रं कृच्छ्रेण
वहति, मूत्राधातं मूत्रं शोष्यते प्रतिहन्यते वा सुश्रुतेऽपि च
मूत्रकृच्छ्रविशेषानेच मूत्राघातानाहु: यथायोग्यतया वातपित्तादिचतुर्षु
मूत्रकृच्छ्रेषुअ मूत्राघांतातन्तर्भावयन्ति; तेन न पृथड्मूत्राधाता-
भिधानम् ।
च. चि. २६, ४४ च. पा. टीका पान १४०८

प्राचीन ग्रंथांत मूत्राघातप्रकरणीं उल्लेखलेले कांहीं रोग मूत्रकृच्छ्रांत समाविष्ट केले पाहिजेत असें आम्हांस वाटतें. मूत्रकृच्छ्र आणि मूत्राघात यांचा चरकाचा टीकाकार चक्रपाणी यानें व्यवच्छेद केला आहे. मूत्रघात व मूत्रकृच्छं हे कांहीं ग्रंथाकार एकरुपच मानत असले तरी त्यामध्यें वेगळेपणा असला पाहिजे. असें चरकानें वा सुश्रुतानें त्यांचें प्रत्येकी भिन्नभिन्न अध्यायांत वर्णन केलें आहे. यावरुन वाटतें. मूत्रकृच्छ्रामध्यें मूत्रप्रवृत्ती कष्टानें होते. मूत्रप्रवृत्तीचेवेळीं वेदना होतात. मूत्रप्रवृत्ती वारंवार होते असें म्हटलें आहे, पण मूत्राचें प्रमाण एकूण अल्प होतें. असें स्पष्ट शब्दांत म्हटलेलें नाहीं.

मूत्रघातामध्यें मात्र `मूत्रं शोष्यते' आणि ``मूत्रं प्रतिहन्यते'' अशा दोन घटना असतात. शोष्यते शब्दानें मूत्राची उत्पत्तीच होत नाहीं. असा अर्थ अभिप्रेत असून, `प्रतिहन्यते' या शब्दानें मूत्राचें बहि:क्षेपण अवरुद्ध होते. मग ते मूत्रवह स्त्रोसांमध्यें आलेल्या शैथिल्यानें होवो किंवा मुत्रवहस्त्रोतसाच्या पीडनानें होवो. मूत्रकृच्छ्र व मूत्राघात यांचा हा वेगळेपणा दृष्टीपुढें ठेवून प्राचीन ग्रंथकारांनीं मूत्रघातांत वर्णिलेले कांहीं रोग येथें मूत्रकृच्छ्रांतच सांगत आहोत.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP