मज्जवहस्त्रोतस - कुब्ज
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
हृदयं यदि वा पृष्ठमुन्नतं क्रमश: सरुक् ।
क्रुद्धो वायुर्यदा कुर्य्यात्तदा तं कुब्जमादिशेत् ॥
वंगसेन-वातव्याधी १०८ पान ३३५.
पृष्ठवंशामधील अस्थि व उरोस्थि यांच्या आश्रयानें वात प्रकुपित होऊन तेथील मज्जा व स्नायु या धातूंना दुष्ट करतो त्यामुळें उराचीं हाडें वा पृष्ठवंश यांना पुढच्या किंवा मागच्या बाजूस बांक येतो. या व्याधीस कुब्ज (कुबड येणें) असें म्हणतात. स्थान व लक्षणें यावरुन वातव्याधी अनेक प्रकारचा संभवतो. त्याला नांवेंही स्थान व लक्षण भेदानेंच प्राप्त होतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP