मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
भ्रम

मज्जवहस्त्रोतस - भ्रम

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


चक्रवत् भ्रमतो गात्रं भूमौ पतति सर्वदा ।
भ्रमरोग इति ज्ञेयो रज: पित्तानिलात्मक: ॥२०॥
मा. नि. मुर्च्छा १९. पृ. १६६

पित्तवात हें शारीर दोष व रज हा मनोदोष यांच्यामुळें चक्कर आल्यासारखी वाटणें वा चक्कर येऊन पडणे, फिरल्यासारखे होणे या लक्षणानीं युक्त असा रोग उत्पन्न होतो त्यास भ्रम असें म्हणतात.

विषयग्रहण

विषयोऽभिप्रवर्तते इत्यनेन मनश्चेष्टितं, मनश्चेष्टापुर:सरमेव
विषयप्रवृत्ते: । मनसोऽपि वातप्रयत्नाद्विनाऽभाविनी प्रवृत्ति-
रिति कष्ठान्नोक्ताऽपिअ सामर्थ्यादाक्षिप्ता । अत एव चरके
``वाक्प्रवृति: प्रयत्नोर्जो बलवर्णादि कर्म च'' (च. वि.अ. २८)
इति प्रयत्नोऽपि कर्मोक्तं वायो: । तत्र प्रयत्नस्य मनसो
द्विधा प्रवृत्ति:; तद्यथा-स्वार्था, बाह्य विषयार्था च । तत्र
स्वार्थानामाध्यात्मसुखदु:खचिन्ताध्येयादौ, बाह्या रुपादि
ग्रहणे पुनर्विषयार्था । तेन विषयप्रवृत्तिग्रहणमुपलक्षितम् ।
अतो विषयाप्रवृत्तिलक्षणमनसोऽध्यात्मसुखदु:खादौ
प्रवृत्तिमुपलक्षयन्ति । अत एव चरके - ``वाक्प्रवृत्ति:
प्रयत्नोर्जौ'' इति प्रयत्नमात्रग्रहणं कृतं, प्रयत्नसय मन:
प्रवृत्ते:; मन:पुर:सराणामिन्द्रियाणां विषयोप्रवृतौ हेतु-
त्वात् । अभिप्रवर्तत इति अभिमुखं प्रथमं रुपाद्यर्थग्रह-
णाय प्रवर्तते, विषयाभिमुखीभावमात्रे हि प्रथमं विशेषा-
णामग्रहणात् । अथवा अभिव्याप्य प्रकर्षेण रुपाद्यर्थविशेषो-
पलम्भे प्रवर्तते, विशेषेणाभिव्याप्तौ हि विशेषाणामेव
ग्रहणात् । तदेवं वातप्रयत्नादात्ममन:पुरस्सराणीन्द्रि-
याणि अर्थोपादानायाभिप्रवर्तन्ते; वातप्रयत्नविकृत्या तु
निर्मनस्कतया न मनसा स्वार्थेन मन:पुरस्सराणा-
मिन्द्रियानां च रुपादि सामान्यविशेषग्रहणं प्रवर्तत इति ।
भवति चात्र - ``प्रत्येति प्रागनुद्भिन्नोपाधिवस्त्वेव केवलम् ।
पश्चादभ्येति तद्भेदान् विशेषान्वेषणोत्सुक:'' इति ।
सु. नि. १-१५ न्या. च. टीका, पान २६०.

उदानाच्या कर्मामध्यें वाक्प्रवृत्तिसवेच प्रयत्नाचा जो उल्लेख आहे तो मनाच्या कर्माचा द्योतक आहे. मनाचे बाह्य व आभ्यंतर वा स्वार्थ असें दोन प्रवृत्तिभेद आहेत. स्वार्थ वा अभ्यंतर प्रकारामध्यें आत्म्याच्या अधिष्ठानानें मन सुख, दु:ख, चिंतन, ध्यान, इत्यादि केवळ मानसिक म्हणतां येतील अशी कर्मे करते. शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध या विषयांच्या ग्रहणाकडे इंद्रियांना (मनच) प्रवृत्त करते. मनाचें हे बाह्य कर्म होय. मनानें प्रेरणा दिल्यावाचून इंद्रियें विषयग्रहण करण्यास प्रवृत्त होत नाहींत. तसेच विषयग्रहणातील ते ते विषय स्पष्टपणे आकलनासाठी मनाचे साहचर्य इंद्रियासवे असावे लागते. मनाच्या या बाह्य वा आभ्यंतर क्रिया वाताच्या प्रेरणेनेच होत असतात. वाताची प्रेरणा जर सुव्यवस्थित नसेल तर मनाची बाह्य वा आभ्यंतर कर्मे प्रकृत स्थितींत होऊं शकत नाहींत. मनाच्या वहनासाठी वायूच्या गतिमत्वाची अपेक्षा असते, असा याचा अर्थ आहे. वाताच्या विकृतीचा परिणाम अशा रीतीनें मनाच्या व तद्वारा ज्ञानग्रहणाच्या कार्यामध्यें विकृति उत्पन्न करतो. अवस्थाभेदानुरुप हींच विकृति तंद्रा, मोह, अतत्वाभिनिवेश, मद, उन्माद, अपस्मार, मूर्च्छा, संन्यास या व्याधींना कारणीभूत होते.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP