मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
संन्यास

मज्जवहस्त्रोतस - संन्यास

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


वाग्देहमनसां चेष्टामाक्षिप्यातिबला मला: ॥
संन्यस्यन्त्यबलं जन्तुं प्राणायतनमाश्रिता: ॥
स ना संन्याससंन्यस्त: काष्ठीभूतो मृतोपम: ।
प्राणैर्विमुच्यते शीघ्रं मुक्त्वा सद्य:फलां क्रियाम् ॥
तल्लक्षणमाह - वागित्यादि । अतिबला इत्यनेन मूर्च्छाया:
प्रारम्भकदोषेभ्योऽधिकत्वेन प्रवृद्धा दोषास्तमश्चेति बोध-
यति । संन्यस्यन्ति मोहयन्ति । स ना पुरुष: संन्यास-
संन्यस्त: संन्यासपीडित:, काष्ठीभूत इति अत्यन्तनिष्क्रि-
यत्वेन अकाष्ठ एव काष्ठवद्‍भूत: । अत एव मृतोपम इति ।
मुक्त्वा सद्य: फलां क्रियामिति सूचीव्यधनाञ्जनाव-
पीडनशूकशिम्बीफलावघर्षणादिरुपा क्रिया यदि न क्रियते
तदा प्राणैर्विमुच्यते, अन्यथा तु जीवतीति ॥२२॥
म. टीकेसह मा. नि. मूर्च्छा पान १६७

मूर्च्छा उत्पन्न करणार्‍या कारणांनीं अधिक तीव्र स्वरुपांत प्रकुपित झालेले दोष, प्राणायतन जे शीर त्या ठिकाणी स्थानसंश्रय करुन त्यांतली देह व मन यांना मिळणारी प्रेरणा नष्ट करुन (आक्षिप्य विनाश्य आ. टींका) दुर्बल पुरुषामधें संन्यास हा व्याधी उत्पन्न करतात. या व्याधीमधें मनुष्य मूर्च्छित होतो. त्याची संज्ञा पूर्णपणे नष्ट होऊन मृतवत् दिसतो. सर्व शरीर लाकडासारखे कठिण व ताठ होते. मद, मूर्च्छा या विकारांत वेग येऊन गेल्यानंतर दोषांचे शमन होऊन मनुष्य बहुधा आपोआप शुद्धिवर येतो. संन्यास ह्या व्याधीमधे मात्र आलेल्या मूर्च्छेचे स्वरुप अत्यंत तीव्र असून योग्य ते उपचार त्वरित केले तरच रोगी सावध होतो नाहींतर रोग्याचे मरण ओढवते.

चिकित्सा सूत्र

`दुर्गेऽम्भसि यथा मज्जद्भाजनं त्वरया बुध: ।
गृह्वीयात्तलमप्राप्तं तथा संन्यासपीडितम् ॥४५॥
अञ्जनान्यवपीडाश्च धूमा: प्रधमनानि च ।
सूचीभिस्तोदनं शस्तं दाह: पीडा नखान्तरे ॥
लुञ्चनं केशलोम्नां च दन्तैर्दशनमेव च ।
आत्मगुप्तावघर्षश्च हितं तस्यावबोधने ॥४७॥
च. सू. अ. २५

खोल पाण्यांत (डोहांत) पडलेले भांडे ज्याप्रमाणे बुडण्यापूर्वी त्वरेने उचलून घ्यावे लागते त्याप्रमाणे संन्यासपीडिताहि त्वरेने उचलून घ्यावे लागते त्याप्रमाणे संन्यासपीडितासहि त्वरेने त्याच्या मूर्च्छेतून सावध करावे लागते. त्यासाठी तीक्ष्ण अशी अंजने, धूम, प्रधमन नस्य, सुयांनीं टोंचणे, डागणे, नखाखाली सुया टोंचणे, केस व रोमावली उपटणे, चावणे, अंगास खाजकुयली लावणे असे तीव्र स्वरुपाचे उपचार केले पाहिजेत. प्रधमन नस्यासाठीं मिरे किंवा श्वास कुठार, यांच्या चूर्णाचा उपयोग करावा. इतर उपचार मूर्च्छेप्रमाणे करावे.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP