मूत्रवहस्त्रोतस् - तूनि
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
अधो या वेदना याति वर्चोमूत्राशयोत्थिता ।
भिन्दतीव गुदोपस्थं सा तूनीत्यभिधीयते ।
गुदोपस्थोत्यिता सैव प्रतिलोमविसर्पिणी ।
वेगै: पक्काशयं याति प्रतितूनीति सा स्मृता ।
सु. नि. १, ८६, ८७,
अध:स्त्रोतोऽभिघातव्याधिं निर्दिशन्नाह अधो या
वेदना यातीत्यादि - वेदना शूलम् । वर्चो मूत्राशयोत्थि-
तेति बिण्मूत्राधाराभ्यां व्यस्तसमस्ताभ्याभूत्थिता जाता ।
भिन्दतीव विदारयतीव स्वव्याप्य यथासंख्यं व्यस्तसमस्तं
गुदोपस्थं याति । गुदोपस्थमिति प्राण्यड्गत्वादेकवद्भाव: ।
उपस्थो मूत्रमार्ग: । भिन्दतीवेति भेदमिव कुर्वतिगुदोपस्थस्य ।
गुदोपस्थोपस्थिता सैव प्रतिलोमं प्रधावितेति पक्वाशयं वेगै:
प्रधाविता `भिन्दतीव' इति पूर्ववाक्याच्छेद:
पान २७०
तूनी रोगांत मूत्रवह स्त्रोतसांमध्यें किंवा पक्वाशयामध्यें वेदना उत्पन्न झाल्यासारखी वाटतें व ती वरुन खालीं याप्रमाणें गुद व शिस्न या अवयवांपर्यत तीव्रतेनें येते. हीच वेदना ज्यावेळी गुदोपस्थाशी उत्पन्न होऊन बस्ती कुक्षी, पार्श्व या भागी जाते, त्यावेळीं या व्याधीस प्रतितूनी असें म्हणतात. वृक्कामधून गविनीद्वारां मूत्राशयाकडे अडखळत घासत येणार्या बारीक अश्मरीमुळें `तूनि' हा व्याधीं उत्पन्न होतो. गुदोपस्थाशी वा त्याच्या आसमंतात असणार्या मांसल अवयवांच्या क्षोभशोथामुळें, वायु विगुणित होऊन वरती जाणार्या वेदना प्रतितूनीमध्यें असतात. लक्षण दृष्टया व्याधींत थोडेसें साम्य असले तरी संप्राप्तीदृष्टया व्याधी वेगळे आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP