`हत्वैकं मारुत: पक्षं दक्षिणं वाममेव वा ॥५३॥
कुर्याच्चेष्टानिवृत्ति हि रुजं वाक्त्स्तम्भमेव वा ।
गृहीत्वाऽर्ध शरीरस्य सिरा: स्नायूर्विशोष्य च ॥
पादं संकोचयत्येकं हस्तं वा तोदशूलकृत् ॥५४॥
च. चि. २८-५३-५४ पान १४५१
गृहीत्वाऽर्धं तनोर्वायु: सिरा: स्नायूर्विशोष्य च ॥
पक्षमन्यंतर हन्ति सन्धिबन्धान्विमोक्षयन् ।
कृत्स्नोऽर्धकायस्तस्य स्यादकर्मण्यो विचेतन: ॥४०॥
एकाड्गरोगं तं केचिदन्ये पक्षवधं विदु: ।
सर्वाड्गरोगस्तद्वच्च सर्वकायाश्रितेऽनिले ॥४१॥
मा. नि. वातव्याधी २९-४१ पान २०३
शरीराचा एक भाग मृतवत् वा आघात झालेल्या अवयवाप्रमाणें निष्क्रिय होतो म्हणून ह्या व्याधीस पक्षवध किंवा पक्षाघात असें म्हणतात. अगाचा एक भाग व्यथित होत असल्यामुळें एकांतवात किंवा, एकांगरोग असेंही म्हणतात.
स्वभाव - दारुण
मार्ग - मध्यम
प्रकार - तीन
पित्तानुबंधज, कफानुबंधज, केवल वातज.
संप्राप्ति
वातकर आहार-विहारांनीं प्रकुपित झालेला वात, शिरा, स्नायु, यांचे शोषण करुन त्या ठिकाणीं विकृति उत्पन्न करतो. चरकानें अर्दित या सर्व अर्ध्या अंगास व्यापून असलेल्या व्याधीची संप्राप्ति सांगत असतांना ``तदोपशोष्यासृक् बाहुं पादं च जानु च ।'' (च. चि. २८-३८) असें वर्णन केलें आहे. यांतील रक्ताचा होणारा शोष आणि पक्षवधांतील शिरांचा शोष यांचा संबंध एकत्र लक्षांत घेतला असतां सिरागत रक्तविकृति या ठिकाणीं अभिप्रेत असावी, असें दिसतें. पुढें उपचारामध्यें ``पक्षघाते विरेचनम्'' हा पित्तावरील उपचार वातव्याधीकरितां सांगतानाही संप्राप्तींतील हा विशेष अंश दृष्टीसमोर ठेवला असला पाहिजे. वातप्रकोपामुळे प्राणाला विकृति येते. इंद्रिय-व्यापार नीट होऊं शकत नाहींत. शिरा, स्नायु, धमनी, यांच्या दुष्टीमुळें एक अंग लुळें निष्क्रिय होतें. व्याधीचा आरंभ बहुधा एकाएकीं भ्रम, मूर्च्छा या लक्षणांनीं युक्त असतो.
लक्षणें
हातापायांची हालचाल करतां येत नाहीं. वेदना होतात. बोलतां येत नाहीं. संधि शिथिल होतात हीं लक्षणें यथासंभव कधीं उजव्या तर कधीं डाव्या अंगामध्यें असतात. रोगी मनानें हळवा, दीन, त्रासिक बनतो. दोषांच्या अनुबंधाप्रमाणें अवयव शिथील, शोथयुक्त, बलहीन वा शुष्क, क्षीण होत जातात.
मा. नि. वातव्याधी ४२,४३ पान २०३ म. टीकेसह
दाहसन्तापमूर्च्छा: स्युर्वायौ पित्तसमन्विते ।
शैत्यशोथगुरुत्वानि तस्मिन्नेव कफान्विते ॥४२॥
शुद्धवातहतं पक्षं कृच्छ्रसाध्यतमं विदु: ॥
साध्यमन्येन संयुक्तमसाध्यं क्षयहेतुकम् ॥४३॥
मा. नि. वातव्याधी ४२-४३ पान २०३
तस्यैव साध्यासाध्यज्ञानार्थमाह - दाहेत्यादि ।
एतच्च लक्षणमन्यत्रापि वातरोगे द्रष्टव्यं अत एव
सामान्येन वायाविति कृतवान् ।
शुद्ध: केवल । अन्येनेति कफेन पित्तेन वा ।
क्षयहेतुकमिति धातुक्षयकुपितशुद्धवातजमिति ॥
मा. नि. वातव्याधी ४२-४३ म. टीकेसह:-पान२०३
पक्षवधामध्यें पित्ताचा अनुबंध असतांना दाह, संताप व मूर्च्छा हीं लक्षणें असतात. कफाचा अनुबंध असतांना शीतता, शोथ व गौरव अशीं लक्षणें असतात. साध्यासाध्यविवेक केवळ वातज पक्षवध शीतता, शोथ व गौरव अशीं लक्षणें असतात. साध्यासाध्यविवेक केवळ वातज पक्षवध (क्षीणता व वेदना या लक्षणांनीं युक्त असतो) अत्यंत कष्टसाध्य असतो. पक्षवधामध्यें वातासह इतर दोषांचा अनुबंध असल्यास व्याधीस साध्यता येते. पक्षवधामध्यें वातासह इतर दोषांचा अनुबंध असल्यास व्याधीस साध्यता येते. पक्षवध हा व्याधी वेगाच्या स्वरुपांतही येतो. उत्तरोत्तर येणारे वेग अधिक गंभीर व घातक असतात. एका वेगानंतर मधल्या काळामध्यें रोगी जरी हिंडता फिरता असला तरी प्रकृत स्थितींतील अवयवांप्रमाणें हातापायांना बळ नसतें. पक्षवधाचे हे वेग १५ दिवस ते तीन महिने टिकतात. क्वचित् त्याहीपेक्षां अधिक काळ लागतो. पक्षवधाचें स्वरुप स्थिरही असतें. अशा स्थितींत रोगी वर्षापेक्षांही अधिक काळ अपंग स्थितींत रहातो. त्यानंतर ज्वर, शोथ, श्वासादि उपद्रव होऊन रोगी मरण पावतो.
गुर्विणीसूतिकाबालवृद्धक्षीणेत्वसृक्क्षयात् ॥
पक्षाघातं परिहरेद्वेदनारहितं यदि ॥३॥
यो. र. वातव्याधी पान ४३७
गर्भिणी, सूतिका, बाल, वृद्ध, क्षीण यांना झालेला वा अति रक्तस्त्रावामुळें झालेला पक्षवध असाध्य असतो. ज्या पक्षवधामध्यें वेदना मुळींच नसतात (स्पर्शज्ञानही नसतें) तो पक्षवध असाध्य असतो.