मज्जवहस्त्रोतस - मूक मिन्मिन गद्गद्
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
आवृत्य वायु: सकफो धमनी: शब्दवाहिनी: ।
नरान्करोत्यक्रियकान्मूक मिन्मिन गद्गदान् ॥६५॥
मूकादींस्त्रीनाह - आवृत्येत्यादि । अक्रियकारान् अवचन
क्रियकान् नञयमभावे ईषदर्थे च । आद्यो मूकोऽवचन:,
द्वितीयो मिन्मिन: सानुनासिकसर्ववचन:, तृतीयो गद्गदो
लुप्तपदव्यञ्जनाभिधायी । एषां च समानकारणा
भिधानेऽपि दुष्टे रुत्कर्षादिभिरदृष्टवशाव्दा भेद इत्युन्नेयम्
॥६५॥
मा. नि. वातव्याधी ६५ म. टीकेसह पान २०९
तम वागेंद्रियं त्वेकं द्विधाभिन्नं यथाकरौ ।
अर्धेन शब्दं वदति गृण्हात्यर्धेन तं पुन: ।
तस्मात् च मूका भूयिष्ठं भवन्ति बधिरा: नरा: ।
वाड्मूलं हि सृतं श्रोत्रं ।
का. सं. १३९
ऐकणें आणि बोलणें हे एकाच इंद्रियाचे दोन भाग आहेत. दोन हात मिळून जसें एकच हस्तेंद्रिय होतें त्याप्रमाणेंच श्रोत्र आणि वाक् मिळून एअक वागेंद्रिय होतें असें काश्यपानें मानलें आहे. जन्मत: बहिरी माणसे मुकी असतात ती यामुळेंच. शब्द ऐकलाच नाहीं तर काय बोलावें हे न समजल्यामुळें शब्दोच्चारच करतां येत नाहीं व त्यामुळें मूकता येते. वायु कफासह प्रकुपित होऊन शब्दवह धमनींचा रोध करतो त्यामुळें शब्दवह धमनीचें कार्य प्रकृत स्थितींत होत नाहीं. शब्दवह धमनींची दुष्टी असेल त्या प्रमाणांत दुष्ट, दुष्टतर, दुष्टतम या चढत्या क्रमानें रोगी गदगद (अस्पष्ट व घोगर्या) (मिन्मिन् (गेंगाणा) मूक असा होतो.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP