शुक्रवह स्त्रोतस - शुक्र-निग्रहज-उदावर्त
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
मूत्राशये वै गूदष्मुकयोश्च शोथा रुजा मूत्रविनिग्रहश्च ।
शुक्राश्मरी तत्स्त्रवणं भवेच्च ते ते विकारा विहतेच शुक्रे
मा. नि. उदावर्त १० पान २२७
मेढ्रे वृषणयो: शूलमड्गमर्दो हृदि व्यथा
भवेत्प्रतिहते शुक्रे विरुद्धं मूत्रमेव च
च सू ७-१० पृ. १०३
शुक्राचा निग्रह केल्यामुळें असें म्हणण्यापेक्षां शुक्रवेगाचा निग्रह केल्यामुळे शुक्रनिग्रहज उदावर्त हा व्याधी उत्पन्न होतो हें म्हणणें अधिक योग्य आहे. मैथुनास प्रवृत्त झाल्यानंतर शुक्रस्त्राव लवकर होऊं नये अशी इच्छा पुरुषाच्या ठिकाणी असते अवयव दौर्बल्य असेल तर मैथुनास प्रवृत्त होतांच अगदी थोडया वेळांत शुक्र वेग उत्पन्न होतो आणि त्याच क्षणी शुक्रस्त्राव झाल्यास मैथुनकर्मही आटोपतें. शुक्रवेग उत्पन्न झाल्यापासून शुक्र स्त्राव होणें या मधल्या काळाचें अंतर वाढावें या साठीं पुरुष प्रयत्न करतो व त्यामुळें शुक्रनिग्रहाचा दोष उत्पन्न होतो. या साठीच त्या श्लोकावर टीका लिहितांना आतंकदर्पणकारानें ``मैथुनवृत्तौ शुक्रविधारणात् ।'' असें मार्मिक वर्णन केलें आहे.
हट्टानें ब्रह्मचर्य पाळणारे वा अविवाहित पुरुष शुक्र निग्रहाचा प्रयत्न करतात. त्यांचें मध्येंही शुक्रनिग्रहज दोष उत्पन्न होतत. या शुक्र निग्रहामुळें शिस्न वृषण, गुद, मूत्राशय या ठिकाणीं वेदना, शूल, शोथ मूत्रावरोध, (गुर्दशोथ, शूलामुळें मलावरोध) शुक्राश्मरी, अंगमर्द, हृद्शूल ही लक्षणे उत्पन्न होतात.
उदर्क क्लैब्य
चिकित्सा
अभ्यंग, अवगाह स्वेद, मद्यपान, मैथुन, दुधाचाबस्ति, आहारामध्यें कुक्कुट मांस व शाली.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP