पुरीषवह स्त्रोतस - पुरीषावृतवात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
वर्चसोऽतिविबन्ध: स्वे स्थाने परिकृन्तति ।
व्रजत्याशु जरां स्नेहो भुक्ते चानह्यते नर: ।
चिरात् पीडितमन्नेन दु:खं शुष्कं शकृत सृजेत् ।
श्रोणीवंक्षणपृष्ठेषु रुग्विलोमश्च मारुत: ।
अस्वस्थं हृदयं चैव वर्चसा त्वावृतेऽनिले ।
च. चि. २८-७०, ७१ पान १४५३
पुरीषावृत वायूमुळें मलावष्टंभ होतो. जेवल्यानंतर पोट जास्त फुगते. स्नेहनाचा विशेष उपयोग होत नाही. अन्नाच्या भारामुळें बर्याच वेळानंतर मोठया कष्टानेंतर शुष्क अशी मलप्रवृत्ती होतें. कटी, वंक्षण, पृष्ठ या ठिकाणीं वेदना होतात. वायूची गती प्रतीलोम होते. हृदयामध्यें कासावीस झाल्यासारखें होते.
चिकित्सा
यूरिष निग्रहज उदावर्ताप्रमाणें करावी. वातघ्न अशीं सिद्ध केलेली अनुलोमन गुणांची घृतें वापरावी.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP