पुरीषवह स्त्रोतस - वाताष्ठीला
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
नाभेरधस्तात्संजात: संचारी यदि वाऽचल: ॥७०॥
अष्टीलावद्धनो ग्रन्थिरुर्ध्वमायत उन्नत: ।
वाताष्ठीलां विजानीयाद्बहिमार्गावरोधिननीम् ॥७१॥
एनामेव रुजोपेतां वातविण्मूत्ररोधिनीम् ।
प्रत्यष्ठांलामिति वदेज्जठरे तिर्यगुत्थिताम् ॥७२॥
मा. नि. वातव्याधी ७०-७२
अष्टीलामाह - नाभेरित्यादि । अष्टीला उत्तरापथे वर्तुल:
पाषाणविशेष इति जेज्जटमतानुवादी कार्तिक: कर्मकाराणां
वर्तुलादीर्घा लौहभाण्डीति गयदास: । उर्ध्वमायत उपरीदीर्घ: ।
उन्नतस्तिर्यगुन्नत: । वातकृता अष्ठीला वाताष्टीलेति
स्वरुपपरं व्यावृत्यभावात् । बहिर्मार्गावरोधिनीं वातमूत्र-
पुरीषावरोधिनीम् । एतामित्यादि सैव जठरे तिर्यगुत्थिता
तिर्यगायता प्रत्यष्ठलेति भेद: । वातविण्मूत्ररोधिनीमिति
विशेषपरम् ।
टीका पान २१०-११
वात प्रकोपामुळें नाभीच्या अधोभागी स्थिर किंवा थोडीशीं हलणारी अशी गोल लांबट आकाराची टणक ग्रंथी उत्पन्न होते. या ग्रंथीमुळे वात-पुत्र-पुरीष यांचा अवरोध होतो. हिला वाताष्टिला असें म्हणतात. याच स्वरुपाची ग्रंथी नाभीचे वर जठरभागीं किंचित् तिरपी अशी उत्पन्न झालेली असते त्यावेळी तिला प्रत्यष्ठिला असें म्हणतात. या प्रकारामध्यें शूल हें लक्षण विशेष असते वात मूत्र पूरीषांचा रोधही अधिक असतो. नाभीच्यावर जठर भागी वा नाभीचे खालीं असणें हेंच वाताष्टीला व प्रत्यष्टीला यामधील व्यवच्छेदक लक्षण आहें. वातमुत्रसंग व शुल ही लक्षणें दोन्हीकडे संभवतात.
पक्वाशय वा लघ्वंत्र यांच्या कोणत्या तरी भागास वातकफ प्राधान्यानें शोथ येऊन तो लंब वर्तुळ (वरवंटयाच्या) आकाराच्या ग्रंथीचे स्वरुप धारण करतो हा व्याधी बराच चिरकारी असा आहे. यास सान्निपातावस्था प्राप्त झाल्यास तो असाध्य व मारकही बनतो.
चिकित्सा
गुदगत, पक्वाशयगत वाताप्रमाणें करावी. विशेषत: वरुन ग्रंथीभागी लेप करावा. दशमूल, पुनर्नवा, वरुण, शिग्रु, गूग्गूळ, त्रिकटू लता करंज, यांचा लेप करावा.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP