`क्रुद्ध: स्वै कोपनैर्वायु: स्थानादूर्ध्वं प्रपद्यते ॥२८॥
पीडयन् हृदयं गत्वा शिर: शड्खौ च पीडयन् ।
धनुर्वन्नमयेद्गात्राण्याक्षिपेन्मोहयेत्तदा ॥२९॥
स कृच्छ्रादुच्छ्वसेच्चापि स्तब्धाक्षोऽथ निमीलक: ।
कपोत इव कूजेच्च नि:संज्ञ: सोऽपतन्त्रक: ॥३०॥
दृष्टिं संस्तभ्य संज्ञा च हत्वा कण्ठेन कूजति ।
हृदि मुक्ते नर: स्वास्थ्यं याति मोहं वृते पुन: ॥
वायुना दारुणं प्राहुरेके तदपतानकम् ॥
मा. नि. वातव्याधी २८ ते ३१.
अस्यैवावस्थाविशेषावपतंत्रकापतानकावाह-क्रुद्ध इत्यारभ्य
एके तदपतानकमित्यन्तेन । स्वै: कोपनैरित्यनेन रुक्षादि-
कुपित: स्वतन्त्रो नत्वावरणकुपित इतीशान: । निमीलि-
ताक्ष: स्तब्धाक्षो वा भवतीत्यर्थ: । आक्षेपकश्चतुर्विधो
भवति - दण्डापतानकोऽभ्यन्तरायामो बहिरायामोऽ-
भिघातजश्चेति । दृढबलेन यद्यप्याक्षेपकात् पूर्वमन्तराया-
मबहिरायामौ पठितौ, तथाऽप्याक्षेपकविशेषावेतौ मन्तव्यौ
श्रुतदर्शनात् ॥
म. टीका
``क्रुद्ध: स्वै: कोपनैर्वायुरपानो नाभीसंश्रय । संदुष्य
[हृदयस्थं च मनो व्याकुलयेत्तत: पीडयन् ]
हृदयं प्राप्य शिर: शड्खौ च पीडयेत् । आक्षिप्य चाखिलं
देहं मोहयेच्च पुन: पुन: । स कृच्छादुछ्रवसेच्चापि
स्वेदशैत्ययुतौ बहि: । स निद्रां लभते नीरं प्राप्य चाशु
प्रबुध्यते ॥
त्रसते कम्पते भूयो नि:संज्ञ: सोऽपतन्त्रक: ।
प्रलापो वक्त्रकटुतां भ्रमो मूर्च्छाऽरुचिस्तृषा । तस्मिन्पि-
त्तान्विते स्वेद: पीताभ: शीतकामिता । शिरोड्गगौरवं
ग्लानि: शीतद्विट् मन्दवेदन: । कफान्विते च सदनं शैत्यं
च हृदयग्रह: । वातोल्बणेऽस्ड्फुरणं शिरोमन्याकटि-
व्यथा । धैर्यादि प्लवो दैन्यं विषयेष्वनवस्थिति:''
आ. टीका
स्वत:च्या कारणानें स्वतंत्रपणें प्रकुपित झालेला वायु विमार्गग होऊन हृदय, मन व (तत्स्थित प्राणवायु) यांना व्याकुळ करतो. हृदय, शिर, शंख यांच्यामध्यें पीडा होतें. अवयवांना झटके येतात. अवयव धनुष्याप्रमाणें वांकडे होतात. श्वासोच्छ् वास कष्टानें होतो. डोळे तारवठतात किंवा मिटतात (उघडतां येत नाहींत), पारव्याप्रमाणें घुमतो (कण्हतो), संज्ञा नष्ट होते, झोंप थोडावेळ टिकते व लगेच जाग येते, भीति वाटते, अंग कापतें या व्याधीस अपतंत्रक असें म्हणतात.
व्याधीच्या सम्प्राप्तीत पित्ताचें आधिक्य असल्यास प्रलाप, तोंड कडू होणें, भ्रम, मूर्च्छा, अरुचि, तृष्णा, स्वेद, पीतवर्णता, आणि शीताची इच्छा अशीं लक्षणें असतात. कफाचें प्राधान्य असतांना शिर व अंग जड होणें, ग्लानि, अंग गळून जाणें, थंडी वाजणें, हृदयामध्यें (छातीत) आवळल्यासारखें वाटणें, शीतता नकोसें होणें, वेदना कमी असणें अशीं लक्षणें असतात. वाताचें प्राधान्य असतांना अवयवांमध्यें स्फुरण, शिर, मान, कटी या ठिकाणीं वेदना, धैर्य नष्ट होणें, दीनता, आणि विषयग्रहणासंबंधीं चंचलता अशीं लक्षणें होतात. अपतानक असा अपतंत्रकाचाच एक प्रकार आहे. कांहीं अपतानक हें दुसरें नांव आहे असें मानतात. या अपतानकामध्यें डोळे तारवटणें (किंवा दिसेनासें होणें), संज्ञा नष्ट होणें (मूर्च्छा येणें), कंठकूजन अशीं लक्षणें असतात. वात हृदयादि स्थानांतून निघून गेला असतांना बरें वाटतें आणि वायूनें स्थानसंश्रय होताच पुन्हां मूर्च्छा येते. हे विकार निज आहेत. आमच्या मतें पुन्हां पुन्हां मूर्च्छा येणें किंवा व्याधीचें वेग येणें व मधल्या काळांत जरा बरें असणें हें अपतानकाचें वैशिष्टय असावें. अपतंत्रकामध्यें वेग येण्याची प्रवृत्ति नसावी. आतंकदर्पण टीकेंत हें अपतानकाचें वैशिष्टय असावें. अपतंत्रकामध्यें वेग येण्याची प्रवृत्ति नसावी.
आतंकदर्पण टीकेंत उद्धृत केलेल्या वचनाप्रमाणें अपतंत्रकामध्येंही पुन्हां पुन्हां वेग येण्याची प्रवृत्ति असते, असें एक मत आहे. त्या मताप्रमाणें अपतंत्रक व अपतानक हे पर्याय शब्दच ठरतील.
गर्भपातनिमित्तश्च शोणितातिस्त्रवाच्च य: ॥
अभिघातनिमित्तश्च न सिद्धयत्यपतानक: ॥
असाध्यत्वमाह गर्भपातेत्यादि । गदाधरस्त्वाह-
कफपित्तान्वित इत्यादिना निमित्तभेदेनाक्षेपकश्चतु-
र्धेति, तद्यथा एक: कफान्वितेन वातेन,
द्वितीय: पित्तान्वितेन, तृतीय: केवलेन, चतुर्थोऽ-
भिघातेनेति । अत्र पक्षे गर्भपातशोणितातिस्त्रावजौ
केवलवातेन ग्राहयौ, ऐतषां च मुहूर्महुराक्षेपणं
बोध्यं, आक्षेपकविशेषत्वात् ॥३८॥
मा. नि. वातव्याधी ३८ म. टीकेसह पान २०२
अपतानकाच्या उत्पत्तीस गर्भपात, रक्तस्त्राव आणि अभिघात अशीं विशिष्ट कारणें सांगितलेली आहेत. या कारणांनीं उत्पन्न असाध्य होतो असें म्हटलें आहे. टीकाकारानें या अपतानकाचें केवळ व अनुबंध युक्त असें कारण भेदानें जे प्रकार पाडले आहेत तें योग्य नाहींत. गर्भपात व रक्तस्त्राव यांनीं केवळ वातज अपतानक होतो असें म्हणण्यांत कफपित्तानुबंधी अपतानक अभिघातामुळें उत्पन्न होतो असें सुचविलें जातें तें योग्य नाहीं. आक्षेपक हा स्वतंत्र व्याधी मानावा असें आमचें मत पुढें उल्लेखलें आहेच. टीकाकारानें सर्वांनाच आक्षेपकांत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळें वर्गीकरणाचें हें वैचित्र्य उत्पन्न आहे.
दंडापतानक -
``कफान्वितो भृशं वायुस्तास्वेव यदि तिष्ठति ॥
दण्डवत्स्तम्भयेद्देहं स तु दंडापतानक: ॥३२॥
एषां लक्षणमाह कफान्वित इत्यादि । भृशं कफान्वित
इत्यनेन पित्तमपि न वार्यत इत्याहु: चरके त्वस्यासाध्यत्वं
केवल वातज त्वज द्रष्टव्यम् । यदाह - ``पाणि पादशिर:
पृष्ठश्रेणिस्तम्भ्नाति मारुत: दण्डवत् स्तब्धगात्रस्य
दण्डक: सोऽनुप्रक्रम:'' (च. चि. स्था. अ. २८) इति
- तास्वति सर्व धमनीषु
मा. नि. वातव्याधी म. टीकेसह पान २०१
अपतानकाच्या संप्राप्तींतील वातदोष कफासह प्रकुपित होऊन सर्व शरीराला काठीसारखें ताठ करतो या व्याधीस दंडापतानक असें म्हणतात. वाग्भटाने कफासहच आमाचाही उल्लेख या व्याधीत केला आहे. त्यावरुन या व्याधींतील दोष साम असतात असें दिसतें. (वा. नि. १५-४२)
चरकानें दंडक या नांवानें हा व्याधी उल्लेखला असून त्यामध्यें कफानुबंधाचा उल्लेख केलेला नाहीं. आमच्या मतें कफानुबंध वैकल्पिक मानावा. काठीसारखें ताटणें हें व्याधीलक्षण मानावें. केवळ वातज असल्यास हा व्याधी असाध्य होतो आणि कफानुबंध असल्यास कष्टसाध्य असतो असें समजावें.