मूत्रवहस्त्रोतस् - उष्णवात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
व्यायामाध्वातपै: पित्तं बस्तिं प्राप्यानिलान्वितम् ।
बस्तिं मेढ्रं गुदं चैव प्रदेहत्स्त्रावयेदध: ।
मूत्रं हारिद्रमधवा सरक्तं रक्तमेव वा ।
कृच्छ्रत्पुन: पुनर्जन्तोरुष्णवातं ब्रुवन्ति तम् ।
मा. नि. मूत्राघात १५-१६ पान २४६
बस्तिं प्राप्य बस्यादिकं प्रदहन् मूत्रमध: स्त्रावयेत् कीदृशं
हारिद्रं अथवा सरक्तमीषद्रक्तं, अथवा केवलं रक्तमेव ।
आ. टीका
व्यायाम, फार चालणें, ऊन या कारणांनीं वातपित्तांचा प्रकोप होऊन त्यामुळें बस्तीचा क्षोभ होतो. बस्ति, मेढ्र, गुद या ठिकाणीं दाह होतो. शूल होतो. मूत्र पिवळें, रक्तवर्ण वा रक्तयुक्त असतें मूत्रप्रवृत्ति वारंवार, कष्टानें होते.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP