मज्जवहस्त्रोतस - उदावर्त
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
निद्रानिरोधज
जृम्भाड्गमर्दोऽक्षिशिरोतिजाऽयं निद्राभिघातादथवाऽपि तन्द्रा ।
मा. नि. उदावर्त पान २२७
निद्राया मोहमूर्धाक्षिगौरवालस्यजृम्भिका: ॥१२॥
अंगमर्दश्च तत्रेष्ट: स्वप्न: संवाहनानि च ।
निद्रेचा वेग धारण केल्यामुळे डोके जड होणे, डोळे जड होणे, आलस्य, तंद्रा, मोह, जृंभा, अंगमर्द, अशी लक्षणे होतात.
चिकित्सा
झोप घ्यावी, अंग दाबून घ्यावे.
अश्रुनिग्रहज
आनन्दजं वाऽप्यथ शोकज वा नेत्रोदकं प्राप्तम्; ञ्चतो हि ।
शिरोगुरुत्वं नयनामयश्च भवन्ति तीव्रा: सह पीनसेन
मा. नि. उदावर्त ६ पा. २२७
आनंदानें वा दु:खानें येणारे अश्रु आवरुन धरल्यामुळे नेत्ररोग, शिरोरोग, डोके जड होणे, पीनस, अरुचि, भ्रम, आणि गुल्म असे विकार उत्पन्न होतात. या व्याधीसाठी झोप घेणे, मन रमेल अशा गप्पा गोष्टी करणे द्राक्षासव घेणे.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP