मूत्रवहस्त्रोतस् - बस्तिशूल
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
`संरोधात् कुपितो वायुर्बस्तिमावृत्य तिष्ठति ॥
बस्तिबड्क्षणनाभिषु तत: शूलोऽस्य जायते ॥
विण्मूत्रवातसंरोधात् बस्तिशूल: स मारुतात् ॥
सू. उ. अ. ४२-१३३-३४ पान ७२६
वात मूत्र पुरीष यांच्या वेगधारणामुळें वायु प्रकुपित होअऊन बस्ति या अवयवास आवृतकरुन त्या ठिकाणीं विकृति उत्पन्न करतो. त्यामुळें बस्ति, वंक्षण, नाभी या अवयवांत शूल उत्पन्न होतो. वातमूत्र पुरीषांचे अनुलोमन होत नाहीं. बस्तिशूल हा वरील वर्णनांतील अवयवांचा विचार करतां केवळ बस्ति या भागापुरताच मर्यादित आहे असे दिसते. उलट मूत्रशूल हा पीडित अवयवांतील कुक्षि व पार्श्व यांच्या उल्लेखावरुन कुक्षिस्थ गौलक जे वृक्क, बस्तिपार्श्वस्थ ज्या गविनी त्यांच्याजवळ असणारा अवयव जो आंत्र, बस्ति व शेवटी शिस्न या सर्व अवयवास व्यापून असणारा व त्या ठिकाणच्या विकृतीचा द्योतक असा आहे.
उपद्रव
ज्वर, अरति, दौर्बल्य, मूत्रकृच्छ्र
साध्यासाध्यता
मूत्रशूल व बस्तिशूल हे दोन्ही व्याधी थोडया दिवसाचे व अल्प लक्षणात्मक असतात त्यावेळी साध्य होतात. व्याधी दीर्घ काळपर्यंत असल्यास असाध्य होतो.
चिकित्सा
बस्तिशूलावर मूत्रशूलाप्रमाणेंच चिकित्सा करावी.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP