मूत्रवहस्त्रोतस् - मूत्रसाद
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
पित्तं कफो द्वावपि वा संहन्येतेऽनिलेन चेत् ।
कृच्छ्रान्मूत्रं तदा पीतं श्वेतं रक्तं घनं सृजेत् ।
सदाहं रोचनाशड्खचूर्णं भवेत्तु तत् ।
शुष्कं समस्तवर्णं वा मूत्रसादं वदन्ति तम् ।
मा. नि. मूत्राघात १६ ते १८ पान २४६
विशदं पीतकं मूत्रं सदाहं बहलं तथा ।
शुष्कं भवति यच्चापि रोचनाचूर्णसन्निभम् ।
मूत्रौकसादं तं विद्याद्रोगं पित्तकृतं बुध:
पिच्छिलं संहतं श्वेतं तथा कृच्छ्रप्रवर्तनम् ।
शुंष्कं भवति यच्चापि शड्कचूर्णप्रपाण्डुरम् ।
मूत्रौकसादं तं विद्यादामयं द्वादशं कफात् ।
सु .उ. ५८. २० ते २६ पात ७८९
पित्त वा कफ हे स्वतंत्रपणें वा मिळून वायूशीं संबद्ध होऊन, मूत्रवह स्त्रोतसांची दुष्टी करतात त्यावेळीं मूत्रसाद नांवाचा व्याधी उत्पन्न होतो. या व्याधींमध्यें पित्तप्राधान्य असेल त्यावेळीं पीतवर्ण, रक्तवर्ण अशी मूत्रप्रवृत्ती होते. मूत्र वाळल्यानंतर गोरोचनासारखा डाग पडल्यासारखें दिसतें. कफप्राधान्य असेल त्यावेळीं मूत्र श्वेतवर्ण घन असें असतें आणि मुत्र वाळल्यानंतर गोरोचनासारखा डाग पडल्यासारखें दिसतें. कफप्राधान्य असेल त्यावेळीं मूत्र श्वेतवर्ण घन असें असतें आणि मुत्र वाळल्यानंतर, शंखभस्म कालवलेल्या पाण्यासारखे डाग पडतात. सन्निपातामुळें निरनिराळें वर्ण दिसतात. मूत्र प्रवृत्तीचें वेळीं वेदना होणें, आग होणें, मुत्रघनता हीं लक्षणें या व्याधींत असतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP