पक्वशयस्थोऽन्त्रकुजं शूलाटोपौ करोति च ।
कृच्छ्रमूत्रपुरीषत्वमानाहं त्रिकवेदनाम् ।
च. चि. २८-२८ पान १४४८
पक्वाशयगतवातामध्यें आंत्रकूजन, शूल, आध्मान, (आटोप) मूत्रपुरेषांची सकष्ट प्रवृत्ती, आनाह, सकष्टरज: त्रिकांच्या ठिकाणीं वेदना, अशी लक्षणें होतात.
चिकित्सा
गुदगत व पुरिषगत वातावर स्नेहन, स्वेदन, अनूलोमन, लेखन, शोधन, रसायन या क्रमानें चिकित्सा करावी. एरण्ड स्नेह, हरीतकी, निशोत्तर, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गूग्गुळ, गोक्षुरादि गुग्गुळ, त्रिवंग भस्म, सिद्ध घृते, निरुह, अनुवासन, बस्ती यांचा उपयोग करावा.