मूत्रितस्य स्त्रियं यातो वायुना शुक्रमुद्धतम् ।
स्थानाच्युतं मूत्रयत: प्राक् पश्चाद्वा प्रवर्तते ।
भस्मोदकप्रतीकाशं मूत्रशुक्रं तदुच्यते ।
मा. नि. मूत्राघात १४ पान २४६
मूत्रवेग आला असतांना मैथुन करणार्य पुरुषामध्यें वायु प्रकुपित होऊन तो शुक्राला त्याच्या स्थानापासून च्युत करतो; हें शुक्र मूत्राच्या आरंभी किंवा मूत्र प्रवृत्तिनंतर बाहेर पडतें. मूत्राशी मिसळलेल्या या शुक्रामुळें राख मिसळलेल्या पाण्याप्रमाणें या मूत्राचें स्वरुप दिसतें.
चिकित्सा
अवगाहस्वेद निरुह, अनुवासन बस्ति, उत्तर बस्ति, जेवण्यापूर्वी घृतपान, असें उपचार करावे. तृण पंचमूल, पुनर्नवा, गोखरु, रिंगणी, गुळवेल, त्रिफळा, गोक्षुरादि गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनि, सु. राज वंगेश्वर, त्रिवंग भस्म, चंदनादि चूर्ण, बाळहरीतकीयोग, चतुर्भुज, पाचकेंद्ररस, अशीं औषधें वापरावीं. डाळीचें पदार्थ, मीठ, तिखट, गुरु अन्न फार चालणें, फार व्यायाम, मैथुन ह्या गोष्टी वर्ज्य कराव्या.