मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
बाह्यक्रिमि

स्वेदवहस्त्रोतस - बाह्यक्रिमि

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


बाह्यास्तत्रामृजोद्भवा: ॥४३॥
तिलप्रमाणसंस्थानवर्णा: केशाम्बराश्रया: ।

बहुपादाश्च सूक्ष्माश्च यूका लिक्षाश्च नामत: ॥४४॥
द्विधा ते कोठपिटिकाकण्डूगण्डान् प्रकुर्वते ।
वा. नि. १४/४३-४४ सटीक पान ५२८

तत्र - तेषु बाह्याभ्यन्तरेषु मध्ये, अमृजोद्भवा: -
बाह्यमलरुपेणोत्पन्ना:, बाह्या: । ते च तिलानामिव प्रमाण-
संस्थानवर्णा येषां त एवम् । तथा बहुपादा: सूक्ष्माश्च ।
नामतो नाम्ना, य़ूका लिक्षाश्चेति द्विधा । ते च कोठादीन्
विदधति ।
टीका

कृमींच्या ४ प्रकारच्या उत्पत्तिस्थानांमध्यें स्वच्छता न राखल्यामुळें त्वचेवर उपलेप करणारा जो बाह्य मलस्वेद त्याच्या विकृतीमुळें बाह्य कृमी उत्पन्न होतात. त्यांचे अणुस्वरुप बहुपाद, तिलाकृति - तिळासारखा असा आकार असतो. त्यांना यूकालिक्षा असें म्हणतात. चरकानें लिक्षा या प्रकाराच्याऐवजी पिपीलिका असे म्हटले आहे. (च. वि. ७-१०)

यांचा वर्ण श्वेत वा कृष्ण असतो असे चरक सांगतो. केश, लोम, वस्त्र हे त्यांचे अधिष्ठान असते. कोठ, पिडका, कंडू व गंउ (जवळच्या भागांत ग्रंथी सुजणें) अशीं लक्षणें या उवालिखा कृमीच्यामुळे उत्पन्न होतात.

उपद्रव - केशशातन, त्वक् दुष्टी, क्षुद्र कुष्ठ.

चिकित्सा

उद्वर्तन, अभ्यंग, स्नान, स्वच्छतापालन.

कल्प

निंब करंज, चंदन, रीठा, शिकेकाई, शिताफळीचे बी, सिपिचंदन, (गिरि सिंदूर) अशीं द्रव्यें वापरावीं.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP