मूत्रवहस्त्रोतस् - मूत्राघात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
वेगं संधार्य मूत्रस्य यो भूय: स्त्रष्टुमिच्छति ।
तस्य नाश्येति यदि वा कथञ्चित्संप्रवर्तते ।
प्रवाहतो मन्दरुजंमल्पमल्पं पुन: पुन:
मूत्रातीतं तु तं विद्यान्मूत्रवेगविधातजम् ।
सु. उ. ५८-११, १२ पान ७८७
मूत्राचा वेग पुष्कळ वेळ धारण केल्यामुळें वायू प्रकुपित होऊन बस्तीच्या ठिकाणीं साद उत्पन्न करतो. यामुळें ज्यावेळीं बर्याच काळानंतर माणूस मूत्रोत्सर्गासाठीं जातो त्यावेळीं इच्छा करुन, कुंथूनही लवकर मूत्रप्रवृत्ती होत नाहीं. थोडें थोडें थांबून थांबून बराच वेळपर्यंत मूत्र येत रहातें. त्यावेळीं मंद स्वरुपाची वेदनाहि होते.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP