पुरीषवह स्त्रोतस - वात निग्रहज उदावर्त
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
अधो वातस्यरोधेन गुल्मोदावर्तरुक्क्लमा: । क् क्
वातमूत्रशकृत्संगदृष्टयग्निवधहृद्गदा: ॥२॥
वा. सू. ४/२ पान ५३
सडो विण्मूत्रवातानांमाध्मानं वेदना क्लम: ।
जठरे वाताजाश्चान्ये रोगा: स्युर्वतिनिग्रहात ॥१२॥
च. मू. ७-१२ पान १०३
गुद मार्गानें सरणार्या वायूचा रोध केला असतां आध्मान, शूल, वातमूत्र पुरीषांचा अवरोध, क्लम, उदावर्त, गुल्म, नेत्रदोष अग्निमांद्य, हृद्रोग, असे विकार होतात.
चिकित्सा
स्नेहस्वेदविधिस्तत्र वर्तयो भोजनानि च ।
पानानि बस्तयश्चैव शस्ते वातानुलोमनम् ॥
च. सू. ७-१३ पान १०३
पुरीषनिग्रज उदावर्ताप्रमाणें चिकित्सा करावी. अनुवासन बास्तीचा वापर करावा.
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP