मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
अर्दित

मज्जवहस्त्रोतस - अर्दित

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


``गर्भिणी सूतिका बाल वृद्ध क्षीणेष्वसृक्क्षये ॥
उच्चैर्व्याहरतोऽत्यर्थं खादत: कठिनानि वा ।
हसतो जृम्भतो भाराद्विषमाच्छयनादपि ॥६८॥
शिरोनासौष्ठविबुकललाटेक्षणसन्धिग: ॥
अर्दयित्वाऽनिलो वक्त्र मर्दितं जनयत्यत: ॥६९॥
वक्रीभवति वक्त्रार्धं ग्रीवा चाप्यपवर्तते ॥
शिरश्चलति वाक्सड्गो नेत्रादीनां च वैकृतम् ॥७०॥
ग्रीवाचिबुकदन्तानां तस्मिन् पार्श्वे तु वेदना ॥
यस्याग्रजो रोमहर्षो वेपथुर्नेत्रमाविलम् ॥७१॥
वायुरुर्ध्वं त्वचि स्वापस्तोदो मन्याहनुग्रह: ॥
तमर्दितमिति प्राहुर्व्याधिं व्याधिविशारदा: ॥७२॥
सु. नि. १-६८ ते ७२ पान २६७

अर्दितमाह - उच्चैरित्यादि । अर्दयति पीडयति । अप-
वर्तते वक्री भवति । चलति कम्पते । वाक् सड्गोऽनिर्गमो
वचनस्य । आदिशब्देन भ्रुगण्डादीनां ग्रहणम् ॥
वैकृतं वेदनास्फुरणवैकृत्वादिकम् ग्रीवेत्यादि, यस्मिन् पार्श्वेऽ
र्दितं तस्मिन् ग्रीवादीनां वेदनेति योज्यम् ॥
तन्त्रान्तरे तु मुखार्धवच्छरीरार्ध व्यापकोऽप्यर्दित: पठित: ।
यदाह दृढबल: - `अर्धे तस्मिन् मुखार्धे वा केवले स्यात्तद-
र्दितम्'' (च. चि.स्था. अ. २८) - इति - ननु - यद्येवं
तदाऽर्दिताधांड्ग वातयो: को भेद: ? उच्यते, वेगित्वेनार्दिते
कदाचिद्वेदना भवति; अर्धांगवाते तु सर्व दैवेति भेद:, अथवा
यथोक्त: सर्व लिड्गोऽर्दितस्तद्विपरीतस्त्वर्धाड्गवात इत्याहु: ।
सुश्रुतेन तु मुखमात्र एवार्दित: पठित: अर्ध - शरीरस्यार्धाड्ग
वातेन लब्धवात् । स एवात्र माधवेन लिखित: ॥४४-४६॥
मा. नि. वातव्याधी ४६ म. टीका पान २०४

व्याख्या

अर्दयत्यनिलोवक्त्रं, अर्दित जनयत्यत: । मा. नि. वातव्याधी ४५

वायू हा मुखाला पीडा देतो म्हणून या व्याधीस अर्दित असें म्हणतात.

स्वरुप

दारुण

मार्ग

मध्यम

हेतू

गर्भिणी, सूतिका, बाल, वृद्ध, क्षीण यांना अर्दित होते. रक्तक्षय हेंही एक अर्दिताचें कारण आहे. मोठयानें बोलणें, कठीण पदार्थ चावून खाणें, मोठयानें हसणें, जांभया येणें, ओझें वहाणें, उंचसखल शय्या असणें, कठीण धनुष्य खेचणें (वाग्भट) या कारणांनीं वातप्रकोप होऊन अर्दित उत्पन्न होतें.

संप्राप्ति

प्रकुपित झालेला वायु, शिर, नासा, ओष्ट, हनु, कपाळ, नेत्र यांच्या ठिकाणीं स्थानसंश्रय करुन मुखास पीडा देतो व मुखाचा अर्धा भाग वाकडा करतो.

पूर्वरुपें

रोमहर्ष, कंप, आविलनेत्रता, मुखावरील त्वचेमध्यें संज्ञाल्यत्व, तोद, मन्याग्रह, हनुग्रह, अशीं लक्षणें होतात. शिंक येत नाहीं, घांस गिळणें व चावणें अशक्य होतें.

रुपें

ज्या बाजूला अर्दित असेल त्या बाजूच्या डोळ्याला विकृति येते. (डोळा उघडतां व मिटतां येत नाहीं.) मुखाची हालचाल नीट  करतां येत नाहीं. तें वांकडें होतें, कित्येकवेळां मानही वांकडी होते. ओठ, हनुवटी, दांत, शंख, गंड यांच्या ठिकाणीं अर्दित असलेल्या बाजूला वेदना होतात. बोलतां येत नाहीं.

ततो वक्रं व्रजत्यास्ये भोजनं वक्रनासिकम् ।
स्तब्धं नेत्रं कथयत: क्षवथुश्च निगृह्यते ॥४०॥
दीना जिह्‍वा समुत्क्षिता कला सज्जति चास्य वाक्
दन्ताश्चलन्ति बाध्येते श्रवणौ भिद्यते स्वर: ॥४१॥
च. चि. २८-४०-४१ पान १४४९-५०

बोलणें, घाईघाईचें, दुर्बल, अस्पष्ट आणि दीन होतें असें चरकानें सांगितलें आहे. येथील जिम्ह वाकडें हें विशेषण जिव्हा ह्या अध्याहृत शब्दाशीं लावावें. बोलण्यामध्यें जीभेचा महत्त्वाचा भाग आहेच. तिला वक्रता येतें. त्यामुळें ध्वन्यर्थानें बोलणें, वांकडें होतें असें वर्णन केलें आहे. सुश्रुताच्या गयदास ह्या टीकाकारानें ``दीना लीना जिव्हा'' असाच पाठ घेतला आहे. तेथें जीभ लीन म्हणजे लुळी होते असा अर्थ स्पष्टपणें करतां येतो. वाग्भटानें हंसतां न येणें, वास न येणें, मोह होणें, झोपेंतून दचकून जागे होणें, नीट थुंकता न येणें, किंवा थुंकी एकाच बाजूनें गळणें अशीं लक्षणें दिलीं आहेत. एकायाम असें एक नांव वाग्भटाने अर्दिताकरितां दिलें आहे. (वा. नि. १५-३४ ते ३६)

अर्दिताचे वातज, पित्तज, कफज असे प्रकार सांगून त्यांचीं योगरत्नाकारानें विशिष्ट लक्षणें सांगितलीं आहेत.

`लालातिप्रसव: कम्प: स्फुरणं हनुसंग्रह: ।
ओष्ठयो: श्वयथु: शूलमर्दिते वातजे भवेत्
यो. र. वातव्याधी पान ४३८

पीतमास्यं ज्वरतृष्णा पित्ते मूर्च्छा च धूपनम् ।
गण्डे शिरसी मन्याया शोफ: स्तम्भ: कफोद्भवे ॥१०॥
यो. र. वातव्याधी पान ४३८.

वातज अर्दितामध्यें अतिळाळ स्त्रवणें, कंप, गात्रस्तंभ, हनुवटी जखडणें, ओठ सुजणें, अशीं लक्षणें असतात. पित्तज अर्दितामध्यें मुखाचा वर्ण पिवळसर होणें, ज्वर, तृष्णा, मूर्च्छा, घुसमटणें, (धूपन) अशीं लक्षणें होतात. कफज अर्दितामध्यें गंडभाग, शिर व मान ह्या ठिकाणीं शोथ व स्तंभ हीं लक्षणें असतात. अर्दित व्याधीच्या व्यापकतेसंबंधीं चरक व सुश्रुत यांचीं मतें भिन्नभिन्न आहेत. चरकानें अर्दित व्याधीच्या वर्णनांत अर्दितासह अर्धांगवात वर्णन केलेला आहे. आणि टीकाकारानें अर्दिताचा वेग येतो आणि अर्धांगवात हा सर्वकाळ व्यापून असतो असें त्याचें वर्णन केलेलें आहे. पक्षवध, एकांग रोग या नांवानें चरकानें वेगळा वर्णन केलेला आहेच. आमच्या मतें केवळ मुखापुरत्या मर्यादित विकृतीस अर्दित म्हणावें. एका बाजूच्या शाखा विकृत झाल्या असतां पक्षवध म्हणावें आणि शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या अर्ध्या भागावर परिणाम झाला असतां त्यांस अर्धांगवात वा एकांगरोग म्हणावें.

उपद्रव

दांत हलतात, कानांना बहिरेपणा येतो, स्वर फुटतो हीं चरकानें वर्णन केलेलीं लक्षणें अर्दितामध्यें उपद्रव म्हणून होतात असें आम्हांस वाटतें.

साध्यासाध्यविवेक

क्षीणस्यानिमिषाक्षस्य प्रसक्तं सक्तभाषिण: ॥
न सिध्यत्यर्दितं बाढं त्रिवर्ष वेपनस्य च ॥७३॥
सु. नि. पान २६७

ज्याचा व्याधी तीन वर्षापेक्षां अधिक काळ टिकून राहिला आहे, ज्याचें शरीर कंपयुक्त आहे, जो क्षीण झाला आहे, ज्याचें बोलणें अतिशय अडखळत व खोल येतें, ज्याला डोळ्याची हालचाल करतां येत नाहीं असा अर्दिताचा रोगी असाध्य असतो. `त्रिवर्ष' ह्या शब्दानें तीन वर्षे असें न मानतां ज्याच्या मुख, नासा व नेत्र या तीन ठिकाणांहून स्त्राव होत आहे, असा अर्थ घ्यावा असें टीकाकारानें एक मत सांगितलें आहे. आमच्या मतें `त्रिवर्ष शब्दाचे दोनही अर्थ स्वीकारावेत.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP