मज्जवहस्त्रोतस - तंद्रा
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
इंद्रियार्थेष्वसंप्राप्ति: गौरवं जृम्भणं क्लम: ॥
निद्रार्तर्स्येव यस्येहा तस्य तन्द्रां विनिर्दिशेत् ॥४९॥
सु. शा. ४-४९. सटीक पान ३६०.
निद्रायास्तमोभवाया मोहरुपाया अनुषड्गात्तत्सदृशीं
तन्द्रामप्याह - इन्द्रियेत्यादि । इन्द्रियार्था: शब्दादय:,
तेषामसंप्राप्तिरग्रहणम् । निद्रार्तस्येव निद्रायुक्तस्येव ।
परं निद्रायां प्रबोधितस्य क्लमाभाव:, तन्द्रायां तु प्रबो-
धितोऽपि क्लाम्यति, अत एवात्र क्लमग्रहणम् ॥४९॥
सु. शा. ४/४९ टीका पान ३६०.
तंद्रा - झांपड येणे, या व्याधीमध्यें इंद्रियानां आपापल्या विषयांचे ग्रहण नीट करतां येत नाहीं, झोप आल्याप्रमाणें माणूस पेंगुळतो, जांभया येतात. अंग गळून जाते आणि शरीर जड होते. सावध केले तरी सावध होत नाहीं. निद्रेमध्यें इंद्रिय व मन या दोघांचेंही विषय ग्रहण उरत नाही तंद्रेमध्यें इंद्रिय मोह असतो मन तितके मोहित झालेले नसते.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP