मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
मूत्रशूल

मूत्रवहस्त्रोतस् - मूत्रशूल

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


नाभ्यां वड्क्षणपार्श्वेषु कुक्षै मेढ्राड्गमर्दक: ॥
मूत्रमावृत्य गृह्नाति मूत्रशूल: स मारुतात् ॥१३५॥
सू. उ. अ. ४२-१३५ पान ७२६

वातप्रकोप होऊन तो मूत्राचे सर्व ठिकाणीं आवरण करतो. आणि मूत्रोत्पत्तीच्या कार्यात भाग घेणार्‍या सर्व अवयवांच्यामध्यें विकृति उत्पन्न करतो, त्यामुळें कुक्षी, पार्श्व, आंत्र, नाभि, वंक्षण व मेढ्र या अवयवांमध्यें शूल उत्पन्न होतो. मूत्रप्रवृत्ति अवरुद्ध होते.

चिकित्सा

अवगाहस्वेद, शिलाजतु, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ, सूक्ष्मत्रिफळा, गोक्षुरादिगुग्गुळ, शंखवटी, दशमूलारिष्ट.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP