मज्जवहस्त्रोतस - हनुस्तंभ (हनुग्रह)
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
जिव्हानिर्लेखनाच्छुष्कभक्षणादीभघातत: ।
कुपितो हनुमूलस्थ: स्त्रंसयित्वाऽनिलो हनुम् ॥४७॥
करोति विवृतास्यत्वमथवा संवृतास्यताम् ।
हनुग्रह: स तेन स्यात्कृच्छ्राच्चर्वणभाषणम् ॥५०॥
मा. नि. वातव्याधी ४९-५० पान २०५
जीभ लांब बाहेर काढून हंसणें, कोरडे कठिण पदार्थ चावूण खाणें, मार लागणें, या कारणानें हनुमूलाशीं असलेल्या बंधामध्यें वातप्रकोपानें विकृति होऊन हनुमूलाचे अस्थि आपल्या स्थानापासून भ्रष्ट होतात. या स्थानभ्रष्टतेमुळें (सांधा निखळल्यामुळें) कधीं तोंड घट्ट मिटलेलें रहातें तर कधीं तोंड उघडें रहाते व तें मुळींच मिटता येत नाहीं. चावणें बोलणें या क्रिया करता येत नाहींत.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP