मज्जवहस्त्रोतस - कलायखंज
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
प्रक्रामन् वेपते यस्तु खञ्जान्निव च गच्छति ॥
कलायखञ्जं तं विद्यान्मुक्तसन्धिप्रबन्धनम् ॥६०॥
खञ्जविशेषमाह - प्रक्रामन्नित्यादि । प्रक्रामन्निति गमन-
मारभमाणो वेपते । प्रशद्वोऽयमादिकर्मणि खञ्जन्निव
गच्छति विकलयन्निव गच्छति, गमनारम्मेन वेपते तेन
खञ्जादस्य भेद: । मुक्तसन्धिप्रबन्धनमिति शिथिलीकृत-
सन्धिबन्धनम् । कलायखञ्ज इति शास्त्रे रूढा संज्ञा ;
अयमेवान्यत्र खञ्जवात इत्युक्त: ॥६०॥
मा. नि. वातव्याधी ६० म. टीकेसह पान २०८
कलायखंज हा खंजाचाच एक प्रकार आहे. यामध्यें चालण्याचा प्रयत्न करूं लागतांच सर्व शरीर कांपते; हात, मान, डोकें, लटलटूं लागतें. आणि नंतर मोठया कष्टानें लंगडत लंगडत रोगी कसाबसा थोडेसे चालतो. संधीबंधनें शिथिल झाल्यामुळें या व्याधींत सांधे ढिले होतात.
टीकाकारानें खंजवात असें याचें दुसरें नांव सांगितले असलें तरी ते खंजाचें असावें असें आम्हास वाटतें.
कलायखंज व खंज ह्या दोन्ही व्याधींत लंगडणें हें सामान्य लक्षण असून चालूं लागण्यापूर्वी लटलट कांपणे हें कलायखंजाचे विशेष लक्षण आहे.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP