आज्ञापत्र - पत्र ४
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
राजश्री थोरले कैलासवासी साहेबांमार्गे स्वामी यांणी असाधारण श्रमसाहस करुन औरंगजेब चालोन आला असतां युद्धप्रसंगी त्याचे कितेक प्रमुख सैनिक रणासी आणिले, कितेक शरणागत करुन शाहजादे आदि करुन मुक्त केले. तदुत्तर त्यांचेच पुण्यप्रभावेंकरुन मुख्य शत्रु अतिशयित दुराग्रहीं प्रवर्तोन योग्यायोग्य कार्ये न विचारतां स्वांगे संपादित होत्साता स्थळोस्थळीं अपमान पावोन कथाशेष जाला. परंतु त्या युद्धप्रसंगामुळे राज्याचा यैसा बिज्वर प्रसंग होऊन गेला. संपूर्ण देशदुर्गे पादाक्रांत जाहलीं. राज्य यैसे नांव मात्र सावशेष उरलें; तेंहि निर्मर्याद.
ज्या राज्याचा बंदोबस्त होता जे इतर स्थळिकांस व सकल मांडलिकांस व देशाधिकारी यांस आपले देशसंरक्षणविषयीं याच युक्तीचा
आधार; या राज्यातील नीति व मर्यादा सर्वांनी सिकोन जाव्या; त्या राज्यांत यैसा विस्कळित प्रसंग पाहून राज्यांतील प्रजा म्हणजे तोच राज्याचा जीवनोपाय ते प्रजा अनेक क्षुद्रोपद्रवांमुळें बहुत पीडा पावली. राजसत्तेव्यतिरिक्त दुसर्याचें तिलांशहि स्वामित्व ज्यावरीं नसावें त्यास राज्य शासनापेक्षां इतर शासनें अधिक प्राप्त जालीं. किंबहुना, त्यामुळें त्यावरील राजसत्ताच अवघी उडोन गेली. केवळ अनाथ होऊन कितेक विदेशास गेले. कितेक वृत्तिलोभानिमित्त मात्र इतकेंहि संकट सोसून जीव धरुन राहिले. स्वामीनें त्या सकळ प्रजेस आश्रय देऊन त्यांचे संपूर्ण उपद्रव दूर केले. ज्याचा जैसा श्रम, ज्याचा जैसा व्यवसाय, आणि ज्या भूमीस जैसें पीक, ज्या ठाई जैसा उपाय, तो सर्वहि संरक्षणाची आज्ञा केली. ज्या प्रजेस जिकडून जो उपद्रव होणारा तो सर्वहि चुकविला. जो किल्लेकोटाव्यतिरिक्त मोकळा देश त्यास पुढे हुजुरात व जागजागां हशम व स्वारांचा जमाव ठेऊन ठाई ठाई बरी मजबूती केली. तो प्रांत अगदी पाठीशी लष्कर आदि करुन याचा वेतनाचा पहिलेपासोन जो नियम होता त्यास यथास्थित चालवावें यैसा निश्चय करुन सकलांसहि ज्या गोष्टीत राज्याचें हित आणि स्वामीचें कल्याण त्या गोष्टीस परम साक्षेपीं केले. सर्वांसहि माया लाऊन त्यांपासोन सर्व विचार घेतला.
राजा व राज्य व्यवहार
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP