आज्ञापत्र - पत्र ४३
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
या उपरीहि ज्यास राज्य संरक्षण करणें, आहे त्यापेक्षा अधिकोत्तर साधणें, त्याणें स्वतां गदकोटांची उपेक्षा न करितां, परम सावधपणें, असतील त्यांची यथोक्त मजबुती करावी. नूतन देश गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरदेपासून पुढें जबरदस्तीनें स्थळें बांधून, बांधीत बांधीत तो देश आक्रमावावा. त्या स्थळाचे आश्रयीं सेना ठेऊन त्यापुढील देश स्वशासनवश्य करावा. यैसें करीत करीत राज्य वाढवावें. गडकोटांचा आश्रय नसता फौजेच्यानें परमुलकीं टिकाव धरुन राहवत नाहीं. इतकियांचे कारण ते गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचें मूळ, गडकोट राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण, यैसें पूर्ण चित्तांत आणून कोण्हाचे भरवसियावर न जातां आहे त्याचं संरक्षण करणें व नूतन बांधणे याचा हव्यास स्वतांच करावा, कोण्हाचा विश्वास मानो नये.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP